पापय्या तालीम संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 27, 2022

पापय्या तालीम संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 पापय्या तालीम संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  २६.०१.२०२२ रोजी पापय्या तालीम संघाच्यावतीने जुनी मिल कंपौड येथील ऐतिहासिक पापय्या तालीमच्या प्रांगणात ७३ वा प्रजासत्ताक दिन भव्य व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अॅड. दत्तुसिंग पवार, सरकारी वकील व भारत सरकार पब्लिक नोटरी यांच्याहस्ते व ॲड.एस एस उडाणशिव, अॅड.प्रवीण निकम, संस्थेचे संस्थापक पैलवान चंद्रकांत कदम, अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, उपाध्यक्ष जयंत मोरे, सेक्रेटरी शिवाजी चटके, जॉ.सेक्रेटरी गणेश कुलकर्णी, खजिनदार गजानन लामकाने, सदस्य विजय पाटील, प्रकाश सुरवसे, लक्ष्मण भगत, प्रकाश कदम, प्रकाश पवार, अक्षय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनिल इंगळे, रणजीत खताळ, संभाजी मळगे, अमोल जाधव, विकेश गायकवाड, शुभम घोरपडे, विनायक मस्के, शुभम इंगोले, प्रवीण सुरवसे, ओम इंगळे, संजय हिरळीकर, सलीम सय्यद, सागर पाटकर, विवेक मिनोजी, बबन झिंगाडे, राजू नकाते, इत्यादी व्यायामपटू, कुस्तीपटू, क्रीडाप्रेमी,परिसरातील लहान मुले बहुसंख्येने उपस्थित होते. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.प्रास्ताविक व सुत्र संचालन वसंत कुलकर्णी तर आभार प्रदर्शन जयंत मोरे यांनी केले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages