Hot Posts

6/recent/ticker-posts

टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा - नवाब मलिक

 टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा - नवाब मलिक





मुंबई (कटूसत्य वृत्त):- मी टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा... राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करा असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे. 
दरम्यान ज्याप्रकारे वाद निर्माण केला जात आहे... वातावरण दुषित केले जात त्यावरुन टीपू सुलतान यांचा अपमान केला जात आहे असेही नवाब मलिक म्हणाले. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते येदुराप्पा हे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निर्णय बदलला असेही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रपती कोविंद यांनी टिपू सुलतान यांना धाडसी शहीदाचा दर्जा देताना देश त्यांना विसरु शकत नाही असे भाषण केले होते याची आठवणही भाजपला नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.  टिपू सुलतान इंग्रजासमोर शरण गेला नाही. जी व्यक्ती इंग्रजासमोर झुकली नाही त्यांच्या नावावर वाद उभा केला जात आहे हे राजकारण असून प्रविण दरेकर हे मजुर सोसायटीचे कामकाज नाही. इतिहास समजना आप के बस की बात नही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments