राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 13, 2022

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  राजमाता जिजाऊ यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विदुला बाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
 कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गवाड, छावा संघटनेच्या प्रा. शुभांगी लंबे, शहराध्यक्षा यशोदा कांबळे, स्मिता कोकणे, कामिना चोरमले, कांतीलाल राऊत, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य राजन घाडगे, विजय झुंबड, पवन पवार, परिचारीका लोंढे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.     
 कार्यक्रमापूर्वी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. विदुला बाबर, डॉ. बालाजी गवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष यशोदा कांबळे, शुभांगी लंबे, स्मिता कोकणे,कामीना चोरमले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयात आजच्या दिनी जन्मलेल्या मुलींच्या मातेचा गुलाब पुष्प देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व रुग्णालयात दाखल असणाऱ्या सर्व रुग्णांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मोहोळ शहर महिला आघाडीच्या माध्यमातून यशोदा कांबळे यांच्या संकल्पनेतून उत्तम करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages