सांगोला शहर तालुक्यात काँग्रेसचा "हात"होतोय बळकट. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 13, 2022

सांगोला शहर तालुक्यात काँग्रेसचा "हात"होतोय बळकट.

 सांगोला शहर तालुक्यात काँग्रेसचा "हात"होतोय बळकट

                                                                                                                                                                   


                                                                               



युवकांचा वाढता कल, जुन्या कार्यकर्त्यांना देतोय बळ

सांगोला(कटूसत्य वृत्त):- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.आज राज्यात आणि देशात काँग्रेस वर भाजपा सरकार टीका करीत आहे. काँग्रेसकडूनही भाजपा विरोधात टीकेच्या झोड उठवित आहे.राज्यातील काँग्रेसची पिछेहाट जुन्या आणि जाणता पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेससाठी नक्कीच डोकेदुखी ठरत असल्याची कुणकुण पक्षश्रेठींना लागताच राज्यात नेतृत्व बदल केला आहे. याच नेतृत्वाबदलाचा फायदा म्हणून की काय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात काँग्रेस पक्ष  प्रभावी काम करताना दिसून येत आहे. अनेक जिल्हाध्यक्षाना हटविल्याने त्या त्या जिल्ह्यात काँग्रेस उभारी घेताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात ही "धवलदादांच्या"हातात"सत्ता देताच सोलापूर शहरासह जिल्ह्यभर जनसंवाद यात्रा काढून पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी अंग झाडून कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहेत. सांगोला शहर आणि तालुक्यात सुद्धा काँग्रेसचा "हात' बळकट होताना दिसत आहे. युवकांचा काँग्रेस मधील वाढता जनाधार काँग्रेस पक्षाला उभारी देत असल्याचे चित्र सध्या सांगोला शहर आणि तालुक्यात दिसून येत आहे.
प्रा प्रबुद्धचंद्र झपके-(सदस्य,प्रदेश काँग्रेस कमिटी)  सांगोला तालुक्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येत आहेत. युवकांचा जनाधार ही काँग्रेस पक्षाची जमेची बाजू असून येणाऱ्या काळात काँग्रेस हा पूर्वी पेक्षा जास्त प्रभावी,आणि बलशाली बनेल,यात शंका नाही.ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाला मानणारा जनाधार अजूनही त्याच वेगाने पक्ष संघटन करण्यासाठी प्रयत्न करेल,यात शंका नाही.
 सुनिल भोरे (तालुका अध्यक्ष) युवकांचा पक्ष संघटनेत सहभाग वाढला असल्याने तालुक्यात काँग्रेसचा "पंजा" बळकट होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाने विविध पक्ष वाढीसाठीचे उपक्रम राबविले जातील. सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य देवून काँग्रेस घराघरात पोहचविण्याचा} मानस आहे.
अभिषेक कांबळे (युवा  नेते)  येणाऱ्या सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. गोरगरिबांचा आणि सर्व जाती धर्माना हवाहवासा वाटणारा पक्ष म्हणून काँग्रेसला नागरिकांची पसंती आहे.नक्कीच जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जिल्ह्यात उभारी घेईल.यात शंका नाही.
रविंद्र कांबळे (युवा नेते काँग्रेस) सदयस्थितीत काँग्रेस हा देशातील  बलशाली पक्ष आहे.तालुक्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांना सोबतीला  घेवून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न असेल.शासनाच्या विविध योजना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यत पोहचविण्याचा मानस असेल.
 येत्या काही महिन्यांवर नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. त्या अनुषंगाने सांगोला शहर आणि तालुक्यात काँग्रेस पक्षाचे जुने आणि नवे पदाधिकारी मतभेद विसरून कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. नक्कीच सांगोला शहर आणि तालुक्यातील जनता काँग्रेस प्रेमी आहेत.पण त्यांना पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यासाठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. नुकताच काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील,प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांनी तालुक्यातील पंधरा गावातून जनसंवाद  यात्रा काढून काँग्रेसचा नारा घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील  युवकांचा काँग्रेस मधील जनाधार नक्कीच स्वबळाला बळ देणारा असेल असा विश्वास तालुक्यातील काँग्रेस प्रेमींनी व्यक्त केला आहे.येत्या काही दिवसांत पक्षाला नवीन तालुकाध्यक्ष आणि इतर निवडी होतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages