Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने युद्धात कामगिरी केलेल्या माजी सैनिकांना आणि पीडिसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांचा नागरी सन्मान

 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने युद्धात कामगिरी केलेल्या माजी सैनिकांना आणि पीडिसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांचा नागरी सन्मान


हवेली (ज्ञानेश्वर पाटेकर):- भाजपा युवा मोर्चा शिरूर तालुका आणि शिवराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव म्हाळुंगी या  शिरूर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भारत मातेची सेवा करत असताना ज्या सैनिकांनी प्रत्यक्ष युद्धात लढाई करून भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावली अशा सर्व जेष्ठ माजी सैनिकांचा युद्धवीर सैनिक सन्मान सोहळा म्हणून गौरवण्यात आले. 
तसेच कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न  करता समाजमनाचा आरसा दाखवणाऱ्या पत्रकार  बांधवांचा हि कोरोनायोद्धा सन्मान सोहळा तसेच नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी प्रदीप कंद यांची निवड झाल्याबद्दल त्याचा भव्य नागरी सन्मान सोहळा निमगाव म्हाळुंगी येथील सैनिक भवन मध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग तर प्रमुख पाहुणे मेजर तुकाराम डफळ होते तर संयोजक शिवराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा शिरूर तालुका चे उपाध्यक्ष  बापूसाहेब काळे होते. 
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी केले,सूत्रसंचालन भाजपा युवा मोर्चा सचिव रावसाहेब चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन जय जवान जय किसान आजी माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण यांनी केले. यावेळी 100 पेक्षा जास्त माजी सैनिक वीर पत्नी,विरमाता यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 
तसेच पत्रकार प्रा.नागनाथ शिंगाडे,प्रा. संजय देशमुख,श्री ज्ञानेश्वर पाटेकर, श्री संपत कारकूड,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जालिंदर आदक,सदस्य पत्रकार आकाश भोरडे,आदी पत्रकारांना कोरोनायोद्धा पत्रकार म्हणून सन्मान करण्यात आला. 
तसेच कोरोना काळात निमगाव म्हाळुंगी मध्ये फवारणीचे चांगले कार्य केल्याबद्दल नितीन चौधरी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीपदादा कंद,निमगाव म्हाळुंगी चे सरपंच महेंद्र रणसिंग, उपसरपंच तनुजा विधाटे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य पंडित भुजबळ,भाजपा पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी सरचिटणीस संतोष करपे,भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेशदादा शिंदे,भाजपा जिल्हा ओबीसी सरचिटणीस नवनाथ भुजबळ,भाजपा युवा मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष रोहित खैरे,भाजपा युवा मोर्च्या संघटक सरचिटणीस केशव पाचर्णे, भाजपा युवा मोर्चा सचिव रावसाहेब चव्हाण,वैभव गवारे, मेजर सुनिल गवारे, जय जवान जय किसान आजी माजी संघटनेचे माजी अध्यक्ष शंकरराव लांडगे,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे, माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण, मेजर संजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य डॉ सचिन चव्हाण, एकनाथ लांडगे, सागर कंक, मयूर सूर्यवंशी, कांतीलाल गव्हाणे तसेच निमगाव म्हाळुंगीतील सर्व माजी सैनिक,वीरपत्नी, आणि ग्रामस्थ यानिमित्ताने मोठया संख्येने उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments