संतुलन संस्थेमध्ये राष्ट्रीय कन्या दिनन उत्साहात साजरा
हवेली (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय कन्या दिनाचे औचित्य साधत दगडखान क्षेत्रातील मुलींसाठी संतुलन संस्थेमार्फत सुकन्या समृध्दी योजनेची पासबुक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.दगडखाणीतील मुलींच्या भविष्य कालीन निधीसाठी संतुलन संस्थेच्या पुढाकाराने सुकन्या समृध्दी योजनेची बचत खाते खोलण्यात आले. शंभरहून अधिक खाती पुस्तकांचे वितरण आज राष्ट्रीय कन्या दिनाच्या औचित्याने आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते संतुलन भवन खराडी येथे झालेल्या कन्या मेळाव्यात करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थिनीनी स्वागत नृत्य सादर करून केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संतुलन संस्थेचे संस्थापक ॲड.बी.एम.रेगे यांनी केले. ज्याप्रमाणे संपूर्ण देशभर इतरांसाठी विविध दिन मोठ्या उत्सहाने साजरे केले जातात त्याच उत्सहाने कन्या दिन ही साजरे केले पाहिजेत तरच शासनच्या बेटी बचाव देश बचाव देश बचाव या घोष वाक्याला अर्थ लाभेल, म्हणून संतुलन संस्थेने मोठ्या उत्सहात राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला आहे.
आजची कन्या हि भावी महिला आहे, तिला खऱ्या अर्थाने सक्षम करावयाचे असलेल तर तीच्या जन्मापासूनच पालकांनी तिच्या नावावर बचत केली पाहिजे कि जि बचत ती तिच्या भावी काळात शिक्षणासाठी वापर करून ती तिच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहील. संतुलन संस्था महिलांच्या सक्षमीकरनासाठी नेहमीच अग्रेसर असून येथून पुढेही रचनात्मक संघर्षातून विकास साधला जाईल असे मत मांडले.
आपल्या मार्गदर्शनात आमदार सुनील टिंगरे यांनी समाजातील वंचित घटकासाठी अनेक वर्ष संतुलन संस्था करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. संतुलन करत असलेल्या वंचित घटकांचे प्रलंबित प्रश्न विधान सभेत मांडून संबधित खात्याशी बैठक लावून मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले. संतुलन संस्थेच्या संचालिका ॲड.पल्लवी रेगे यांनी राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमांत संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थिनीनी बेटीया या गीतावर नृत्य सादर करून मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संयोजन पांडुरंग भालेराव, सीमा साळवे, स्नेहप्रभा वैराळ, अश्विनी पात्रे, परमजीत कौर व सुनील मसिह यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ चांदणे यांनी तर आभार अनिल राजगुरू यांनी मांडले.
या प्रसंगी कार्यक्रमास नगरसेवक भैयासाहेब जाधव, महाराष्ट्र खादी ग्राम उद्योगाच्या संचालिका छाया बापट, सामाजिक कार्यकर्ते वैभव पंचमुख, सागर बारदेस्कर, जॉन फर्नांडीस, अविनाश साळवे आदी मिशन क्रांतीचे पदाधिकारी, दगडखाण कामगार परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मर्याप्पा चौघुले, तसेच दगडखाण क्षेत्रातील मुली व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
0 Comments