Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोजकुमार देशमुख' यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व शासनाच्या विविध योजनेचा शिबिर

 मनोजकुमार देशमुख' यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व शासनाच्या विविध योजनेचा शिबिर




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-सध्या सुरू असलेल्या कोविड सारख्या आव्हानात्मक परिस्थितीत रक्ताची गरज सर्वांनाच आहे. ही बाब ओळखून मनोज कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला. हे उपक्रम इतरांनीही राबवावे असे आवाहन यावेळी अजिंक्यराणा पाटील यांनी केले. गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आयोजित केलेल्या ई श्रम कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती करणे, संजय गांधी निराधार योजना, पी एम किसान सन्मान योजना यासह उज्वला गॅस योजनांच्या शिबिराचे उदघाटन अजिंक्यराणा पाटील यांचे हस्ते करण्यात आला 
अनावश्यक खर्चाला फाटा देत मोहोळ रेल्वे स्टेशन येथील युवा नेते मनोजकुमार देशमुख' यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर शासनानाच्या विविध योजनांचा शुभारंभ पार पडले. या रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल १०१ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे आपला प्रतिसाद नोंदवत रक्तदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवानेते अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तूचे वाटप देखील यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित करण्यात आले. 
यावेळी हे सर्व उपक्रम पार पाडण्यासाठी ओंकार देशमुख,अमित पाटील,औदूंबर देशमुख,डॉ भिसे मॅडम,भाऊराव शिंदे, ,किसन देशमुख,धनाजी देशमुख,लक्ष्मण देशमुख,आविनाश वाघमोडे,प्रसाद देशमुख,शंभुराजे देशमुख,रणजित देशमुख,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मित्र परिवार सदस्यांनी परिश्रम घेतले.
'या शिबिरांमध्ये तब्बल १०१ जनांनी रक्तदान करून माणुसकीचे भान जपले आहे. यापुढील काळातही असे आदर्शवत उपक्रम राबवून आम्ही सामाजिक कार्यात भरीव योगदान देणार आहे. युवानेते मनोजकुमार देशमुख


Reactions

Post a Comment

0 Comments