अपरिचित सामाजिक संस्था व दाळगे प्लॉट परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
महिलावर्गाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अपरिचित सामाजिक संस्था व दाळगे प्लॉट येथील महिलांच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस हा आपला राष्ट्रीय सण म्हणून साजरी करतो.२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानानुसार देशाचा कारभार करण्यास सुरुवात झाली. म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक म्हणजे लोकांची सत्ता होय.
भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत हक्क व कर्तव्याची जाणीव ठेवून सर्वांनी संविधानाचे पालन केले पाहिजे असे मत संस्थेचे अध्यक्ष मयुर गवते यांनी व्यक्त केले.
यावेळी लहान मुलांना मिठाईचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी अलका हब्बु, सुनिता कोट्टलगी, अर्चना कोकाटे, लक्ष्मी रेश्मी, प्रभा कळसकर, विजयालक्षमी पसारे,सुमण हिरेमठ, धानम्मा हिरेमठ,प्रियंका उंबरे, रिता मॅकल,वैशाली गवते,आश्विनी दुधनी, निलम दुधनी, श्रीदेवी मुन्नुरेड्डि , छाया बच्चल , अनिता स्वामी,सुवर्णा कुंभार आदी महिला व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
0 Comments