डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या अर्थकारणाला नवदिशा देवून त्याचा पाया घातला - डॉ बागडे
अकलूज (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठ सोलापूर संलग्नित, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज राज्यशास्त्र व सामाजिक शास्त्रे असोशिएशन आयोजित संविधान दिनानिमीत्त आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा राष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये समारोप व्याख्यानपुष्प गुंफताना ते बोलत होतें बाबासाहेबांच्या आर्थीक विचाराची उंची हि त्यांच्या लेखनातूनच समजून येते. या देशाची अवहेलना करणारी इस्ट इंडिया कंपनी असो किंवा या देशातल्या सामाजीक व्यवस्था असो त्या सर्वाचा अभ्यास करून देशाला अर्थकारणात मजबुत करण्यासाठीची विविध प्रबंध त्यांनी लिहले.
रिज़र्व बँक असेल किंवा विमा कंपन्या असतील या सर्व बाबींचा विचार करता बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची कल्पना येते.
देशाचे अर्थकारण सुधारायचे असेल तर शेतकरी, कामगार यांच्यासाठीच्या योजना अंमलात आल्या पाहिजेत. असेही त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविदयालयातील इंग्रजी विभागातील डॉ हणमंत आवताडे म्हणाले कि बाबासाहेबांच्या चतुरस्त्र भुमीकांचा अभ्यास व्हायला हवा महनीय असलेल्या व्यक्तीमत्वाने अनेक प्रकारचे कार्य केलेले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ विश्वनाथ आवड यांनी केले तर प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे डॉ आण्णासाहेब नलावडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागन्नाथ साळवे अमोल खरात, अर्णव खरात, विनायक खरात व टेक्नीकल शेषनसाठी रूद्रप्रताप आवड यांनी प्रयत्न केले.
ऑनलाईन व ऑफलाईन व्याख्यानास महाराष्ट्रातील अनेक नामवंत अभ्यासक, महाविदयालयातील समन्वयक, प्राध्यापक व विचारधारा अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेले बहुसंख्य सदस्य सहभागी झाले होते.
0 Comments