सांगोला - काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सुनिल भोरे यांची तर सरचिटणीस पदी अभिषेक कांबळे यांची निवड
सांगोला (कटूसत्य वृत्त):- बहुचर्चित आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना आस लागून राहिलेल्या तालुका अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या निवडी जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्धपत्रकाद्वारे जाहीर केल्या.सांगोला तालुका काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी काँग्रेस प्रांतिक सदस्य प्रा पी सी झपके यांचे विश्वासू सुनिल भोरे यांची पुनश्च निवड केली.जिल्हा सरचिटणीस पदी महुद बु येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू अभिषेक कांबळे यांची निवड केली आहे.तालुका कार्याध्यक्ष पदी युवा कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे रवींद्र कांबळे यांच्याकडे दिली आहे.
जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाभर काँग्रेस मधील कार्यकर्त्यांची मरगळ दूर करण्यासाठी आणि पुन्हा "हाताचा पंजा"बळकट करण्यासाठी सर्वसमावेशक निवडी जाहीर केल्या.सांगोला तालुक्यातील जिल्हाउपाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी तालुका अध्यक्ष राजकुमार पवार आणि हरिभाऊ पाटील यांच्यावर पक्षाने सोपवली आहे.तर शहराध्यक्ष पदी तौहीद मुल्ला यांची निवड केली आहे.जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी सदस्य पदी ऍड महादेव कांबळे आणि अजय इंगवले यांची निवड केली आहे.
सर्व नूतन पदाधिकारी यांच्या निवडीने सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील,अशी अपेक्षा तालुक्यातील काँग्रेसप्रेमींना लागून राहिली आहे. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील,आणि प्रांतिक सदस्य पी सी झपके सर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.येणाऱ्या नगरपंचायत,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित काँग्रेस ताकद पणाला लावून निवडणुकीत उतरेल,यात शंका नाही.सुनिल भोरे (तालुकाध्यक्ष)
0 Comments