प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते
प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. रेल्वे मैदान, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय ध्वजारोहणाच्या या समारंभास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हनगर, जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख,पंचायत समिती सदस्य अरुण घोलप, मुख्याधिकारी अरविंद माळी, सहा.गट विकास अधिकारी सुरेंद्र पिसे, प्रशिक्षणार्थी तहसिलदार श्रीकांत कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, पोलीस निरिक्षक अरुण पवार, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पी.के.कोळी, यांच्यासह स्वांतत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन उपस्थितांना ध्वज प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच पोलीस दलाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली.
0 Comments