महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब काळे यांची फेरनिवड
हवेली (कटूसत्य वृत्त):- "महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षपदी थेऊरचे माजी सरपंच तात्यासाहेब काळे यांनी फेरनिवड झाली आहे नुकताच त्यांचा सत्कार राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला. तात्या साहेब काळे यांची फेर निवड झाल्या बद्दल कामगारांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तात्यासाहेब काळे यांनी मागच्या कालखंडात राज्यातील साखर कामगारांच्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला संपूर्ण राज्यभर दौरे केले संघटना मजबूत करून कारखान्यावर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून कामकाज करून कारखाना व्यवस्थापन यांच्याशी वारंवार बैठका घेतल्या. यावेळी फेरनिवड झाल्याने पुढील कार्यकाळात आणखी कामगारांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तात्यासाहेब काळे. माजी सरंपच थेऊर ग्रामपंचायत तथा महाराष्ट्र साखर कामगार अध्यक्ष
0 Comments