सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा वार्षिक योजनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीलापालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय मामा शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, यांच्यासह प्रमुख अधिकारी वर्ग उपस्थित होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत सर्वसाधारण योजनेस सोलापूर जिल्ह्याची ४१५ कोटी 92 लाखाची तर 157 कोटीची अतिरिक्त मागणी आलेली होती, करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी अजित दादांकडे वाढीव निधीची मागणी केली.यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याला पाचशे कोटीचा निधी मंजूर केला या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये अनेक मजेदार किस्से घडले. सुरुवातीचा 570 कोटींची मागणी झाली नंतर हा निधी 550 वर आला, त्यानंतर 530 कोटी तर द्या अशी वारंवार मागणी आमदार संजयमामा करत होतेमध्येच भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दादा तुमचे लाडके आमदार आहेत त्यांची मागणी मान्य करा असे म्हणून उपस्थितामध्ये हशा पिकवला, अजितदादा सुद्धा यावेळी आपल्या खुमासदार शैलीत बैठकीला सामोरे गेले.
0 Comments