मोहोळ तालुक्यातून जिल्हा दूध संघासाठी आणखी तीन अर्ज दाखल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीसाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा जि. प.सदस्य बाळराजे पाटील अनगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हणमंत पोटरे, दिपक माळी व सौं.वैशाली शेंबडे यांचा उमेदवारी अर्ज सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी आबासाहेब गावडे यांच्याकडे आज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, बाजार समितीचे सभापती अस्लमभाई चौधरी, हरिभाऊ आवताडे, गोरख खराडे,जगन्नाथ पाटील, तानाजी राठोड,किरण माळी, शहाजी पाटील,नारायणराव गुंड व श्रीधर गुंड इत्यादीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील ६१ पैकी तब्बल ५५ मतदार संख्या ताब्यात असूनही अनगरकर पाटील परिवाराने नेहमीप्रमाणे पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याचा मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
0 Comments