सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हुतात्मा स्मारक, अशोक चौक, सोलापूर येथे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर यांच्या वतीने ग्रंथपाल सौ. वृषाली विवेक हजारे यांच्या हस्ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहण करण्यात आले. वेळी बोलताना सौ. हजारे म्हणाल्या की ग्रंथपालाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान मला दिला याचा अभिमान वाटतो. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, तेजूसिंग चव्हाण, धोंडिबा बंडगर, रामचंद्र कुलकर्णी, ए. एन. गायकवाड, शंकर कस्तुरी, इकबाल शेख, राजेंद्र चिंता, पल्लवी काकी, प्रथमेश् बनसोडे, श्रीपाद गांगुल, उमेश वगरे, कृष्णा शेट्टी, शेखर बिराजदार, पो.कॉ. ज्ञानेश्वर पाथरुट, गोवर्धन भोसले, रामेश्वर अनकाळे, आणि बहुसंख्य वाचक उपस्थितीत होते.
0 Comments