कुर्डूवाडीत नगरपालिकेच्या ताब्यातील गायीचा मृत्यू; जीवनरक्षा व नागरिकांकडून करवाईची मागणी.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 25, 2022

कुर्डूवाडीत नगरपालिकेच्या ताब्यातील गायीचा मृत्यू; जीवनरक्षा व नागरिकांकडून करवाईची मागणी.!

 कुर्डूवाडीत नगरपालिकेच्या ताब्यातील गायीचा मृत्यू 


जीवनरक्षा व नागरिकांकडून करवाईची मागणी.!



 कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कुर्डूवाडी शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी नगरपरिषद आरोग्य विभागा मार्फत मोहिम राबवण्यात आली होती. तब्बल दोन-तीन आठवड्यानंतर पकडलेल्या जनावर पैकी नगरपरिषदेच्या ताब्यातील एका गायीचा मुत्यु झाला आहे.


शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला होता त्यामुळे न.पा.कड़े नागरिकांच्या तक्रारी येत होत्या त्यावर आरोग्य विभागाच्या वतीने रिक्षा फिरवून सदर जनावरे ज्यांच्या मालकीचे आहेत त्यांना आव्हान करण्यात आले होते सदर जनावरांचा बंदोबस्त त्वरित करावा अन्यथा न.पा. मार्फत ही जनावरे पकडण्यात येतील त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे असे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.                



                             सदर जनावरे पकडून माढा रोड वरील कचरा डेपो जवळ ठेवण्यात आली होती. दि.२५ रोजी ही घटना कुर्डूवाडी नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला.या जनावर पैकी काहींच्या मालकांकडून न.पा.मार्फत अवास्तव दंडात्मक कारवाईची मागणी केली जात असल्यामुळे त्या मालकांची तेवढी परिस्थिती नसल्यामुळे ही जनावरे सोडवता आली नसल्याची बोलकी प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त झाली.त्यामुळे वारंवार विनंत्या करूनही नगरपालिका प्रशासनाला याबाबत जराही घाम वेळीच फुटला नाही त्यामुळे ह्या मुक्या प्राण्याचा बळी गेला अशी भावना काही जणांनी बोलून दाखवली


 येथील उपळाई बु.श्री नंदकेशवर गो शाळेने सदर गायी सांभाळ करण्यासाठी  मागितल्या होत्या मात्र यावर निर्णय घेण्यात आला नाही.येथील जीवनरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे संपूर्ण प्रकरणावर करवाईची मागणी केली आहे.


सदर जनावरे हि कचरा डेपो जवळ ठेवण्यात आले.त्यांचा उपासमारी मुळे मृत्यू झाला असून यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.असे जिल्हा प्राणी क्लेश समितीचे सदस्य केतन शहा यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



- नगर परिषदेने पकडलेल्या गायींना व्यवस्थित चारा दिला जात नव्हता सदर गायीचा उपासमारी मुळे मृत्यू झाला असून नगरपालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक दत्ताजी गवळी यांनी केली आहे.


- सदर जनावरा पैकी गायीचा मृत्यू कशाने झाला हे पाहणे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही त्या गायला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पोस्टमार्टम साठी देत आहोत रिपोर्ट काय येतोय पाहणे गरजेचे आहे त्या नंतर सर्व काही समजेल अशी प्रतिक्रिया न.पा.आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages