हुतात्मा स्मृतिदिना तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 13, 2022

हुतात्मा स्मृतिदिना तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 हुतात्मा स्मृतिदिना तसेच राजमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

    

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहरातील हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे,किसान सारडा व कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास तसेच महापालिका कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मातोश्री सेवा कुंज जोडभावी पेठ येथे त्यांच्या समाधीस व तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्मारक स्तंभ येथील स्तंभास महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कराभारी,गटनेते चेतन नरोटे,गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावंकर,नगरसेवक विनोद भोसले,नगरसेविका संगीता जाधव,जनसंपर्क अधिकारी विनोद कुलकर्णी,आनंद मुसळे, शंकर अंजनकर, शीतल परदेशीझ बसवराज जमखंडी, प्रतिक्षित परदेशी, संतोष वेदपाठक, सुधा वेदपाठक, विनय कांबळे, विजय महिंद्रकर, सुबोध धामणगावकर आदी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages