कै. शिंदे आदर्श विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
सांगोला (कटूसत्य वृत्त):- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय सांगोला येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीस ध्वजारोहण कार्यक्रम संस्थाध्यक्ष श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तिरंगा गीत संविधान वाचन घेण्यात आले सदरचा कार्यक्रम कोव्हिडचे सर्व नियम पाळून करण्यात आला. यावेळी प्रशालेतील मुख्याध्यापिका अर्चना गोडसे मॅडम ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणास सहशिक्षक एस .एस कुंभार यांनी मानवंदना दिली.
0 Comments