काजू प्रक्रिया व्यवसाय आपल्या भागात उभारणे ही अभिमानास्पद बाब - आमदार शहाजीबापू पाटील

नाझरे येथे अपेक्स काजू प्रक्रिया उद्योगाला मा आम शहाजी बापू पाटील यांची सदिच्छा भेट
नाझरे (कटूसत्य वृत्त):- नाझरे ता सांगोला येथे नव्याने सुरू झालेल्या काजूप्रक्रिया उद्योगाला सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 26 जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली यावेळी शहाजीबापू पाटील यांनी अॅपेक्स उद्योग समूह संचलित काजू प्रक्रिया उद्योग आपल्या भागातून उभारणे ही खरोखरच अभिमानास्पद व अभिनंदनीय बाब आहे असे मत मांडले
तसेच आपल्या भागात ज्याप्रमाणे डाळिंब त्याप्रमाणे कोकण पट्ट्यात काजूचे उत्पादन होते व इतक्या दूर अंतरावर हा व्यवसाय उभारण्याचे आव्हान नाझरे गावातील तरुणांनी केले असून ध्येयवादाने प्रेरित झाल्यानंतर कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो तसेच आज आपल्या तालुक्याला अशा नवनवीन उद्योगधंद्यांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले व सुरुवात असल्याने मेहनत करून उद्योगाला भरारी द्या असा मौलिक सल्लाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार करण्यात आला
सदर प्रसंगी शिवसेना नेते दादासो वाघमोडे सर प्रा संजय देशमुख माजी प्राचार्य वाय एस बाबर माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाबर युवा नेते राजाभाऊ खरात मंगेश रायचुरे मा उपसरपंच भारत शेलके पत्रकार रविराज शेटे शिक्षक सय्यद अहमद काझी दिलीप बाबर विशाल शेळके अभिजीत ननवरे नितीन विटेकर श्रीनाथ गायकवाड आशितोष कांबळे युवा उद्योजक विपुल शेलके प्रणवराज शेटे असीम काजी प्रतीक बाबर शिवराज मिसाळ इ उपस्थित होते
0 Comments