शिक्षकांनी थोर महापुरुषांचे कार्य व विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत - केंद्रप्रमुख रोहिदास कापसे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 13, 2022

शिक्षकांनी थोर महापुरुषांचे कार्य व विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत - केंद्रप्रमुख रोहिदास कापसे

 शिक्षकांनी थोर महापुरुषांचे कार्य व विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत - केंद्रप्रमुख रोहिदास कापसे

मानेगाव केंद्राच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

माढा (कटूसत्य वृत्त):-  शालेय विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचे महान कार्य व विचार कळावेत याकरिता त्यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनानिमित्त कार्यक्रमाच्या वेळी सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभ्यासपूर्ण माहिती आणि ज्ञान यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि स्फूर्ती निर्माण होईल असे प्रतिपादन मानेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी केले आहे.
ते माढा तालुक्यातील मानेगाव केंद्राच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या वेळी बोलत होते.अध्यक्षस्थानी मानेगावच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अतुल देशमुख होते.
पुढे बोलताना केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी सांगितले की,सर्व थोर महापुरुषांचे कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे.राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांवर बालपणापासून उच्च ध्येय गाठण्यासाठी संस्कार व तशी शिकवण दिली.आजच्या पालकांनी मुलांसमोर उच्च ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे.स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे की,जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा,स्वत:ला कधीच कमी समजू नका परंतु ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नांची जोड महत्त्वाची असते असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण,सुनील मोहिते,स्मिता नाझरे, रमेश पाचफुले,भालचंद्र पारडे, राजकुमार क्षीरसागर,सतीश माळी, शिवशंकर आंधळकर,सुनील चौगुले, आण्णासाहेब पाटील,गोविंद पारडे, आत्माराम क्षीरसागर,गंगाराम मोहिते, प्रसन्न दिवाणजी,अनिता निचळ यांच्यासह विविध प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन करून आभार सहशिक्षक सुनील मोहिते यांनी मानले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages