शरद पवारांची राष्ट्रवादी जिल्ह्यात पुन्हा सक्षम करणार; अक्षय खताळ यांच्या प्रवेशानंतर माजी आमदार पाटील म्हणाले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 13, 2022

शरद पवारांची राष्ट्रवादी जिल्ह्यात पुन्हा सक्षम करणार; अक्षय खताळ यांच्या प्रवेशानंतर माजी आमदार पाटील म्हणाले

 शरद पवारांची राष्ट्रवादी जिल्ह्यात पुन्हा सक्षम करणार; अक्षय खताळ यांच्या प्रवेशानंतर माजी आमदार पाटील म्हणाले



अक्षय खताळ यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती पत्रकार परिषदेत देताना माजी आमदार राजन पाटील, यावेळी डावीकडून अजिंक्यराणा पाटील, महेश कोठे, आ. यशवंत माने, बळीराम साठे, अक्षय खताळ, दिलीप कोल्हे, प्रकाश चवरे.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा खा. शरद पवार व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील अनगरकर यांच्या विचारधारेवर चालणार आहे. त्यामुळे मध्यंतरी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या अनेकांना पुन्हा राष्ट्रवादी आणून शरद पवारांचीच राष्ट्रवादी जिल्ह्यात पुन्हा सक्षम करणार असल्याचा विश्वास माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील हे गुरुवारी, हॉटेल सूर्या येथे अक्षय खताळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या प्रवेशाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी मोहोळचे आ. यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, मोहोळ बाजार समितीचे उपसभापती दत्ता पवार, धनाजी गावडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सज्जन पाटील, महादेव भोसले आदी उपस्थित होते.
राजन पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, मोहोळ तालुक्यातील खताळ कुटुंबियांनी नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा जपली आहे. ते इतरत्र कधीही रमले नाहीत. स्व. तानाजी खताळ हे आमचे सहकारीच होते. मध्यंतरीच्या काळात ते इतरत्र असले तरी नेहमी आमच्या संपर्कात होते. त्यांच्या जाण्याने मोहोळ तालुक्याचे मोठे नुकसान झाले. पुन्हा राष्ट्रवादीसोबत येण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आज त्यांचे सुपुत्र अक्षय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मान्य करून पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे.
तानाजी खताळ आज हयात नसले तरी त्यांच्या इच्छेनुसारच अक्षय खताळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अक्षय यांच्या पंजी पूर्वीच्या काळी काँग्रेस पक्षात काम करत होत्या. त्या लांबोटीच्या सरपंच देखील होत्या. त्यांनी अखंडपणे काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा जपली. तोच वारसा आता अक्षय हे सांभाळत आहेत. खताळ आणि पाटील परिवाराचे राजकारणापलीकडेचे संबंध आहेत. असेही माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.
अक्षय खताळ म्हणाले, मी राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करायचे निश्चित होते. पण, काही पत्रकारांनी व काहींनी मला फसवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर त्यांनी पुढे जुळवाजुळवदेखील केली. आ. गोपीचंद पडळकर यांना मला भेटायचे होते. मी त्यांना भेटलो देखील. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना मी ओळखत सुध्दा नाही. मात्र त्यांच्याकडे मला काही लोकांनी घेऊन गेले. तिथे मला पक्षाचे पद दिले. काढलेले फोटो व्हायरल करू नका. असे मी त्यांना सांगितलं होतं पण, त्यांनी खोडसाळपणे ते फोटो व्हायरल केले. ते मला अजिबात पटले नाही. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहोत. कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवून आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. फक्त राजन पाटील यांच्या आशीर्वादासाठीच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे खताळ म्हणाले.
आ. यशवंत माने म्हणाले, कोणत्याही पदाच्या अपेक्षेने अक्षय खताळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. कोणत्याही अटी व शर्थीशिवाय त्यांनी पक्षात प्रवेश केला. एक वर्षापूर्वी स्व. तानाजी खताळ आणि माझी भेट झाली होती. त्या भेटी दरम्यान त्यांची तीन मुलेही त्यांच्यासोबत होती. त्याच वेळी स्व. तानाजी यांनी ही मुले यापुढे तुमच्या सोबत काम करतील. असे त्यावेळी सांगितले होते.

7 आमदार 2 खासदार असलेल्या भाजपाची जिल्ह्यात दैना; ओबीसी जिल्हाध्यक्षाच्या उमेदवारासाठी करावी लागते भाजपाला बळजबरी..!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages