माढ्यात प्रभाग क्र ४ मध्ये साठे भावकीच आले आमने सामने,माजी नगराध्यक्षा अॅड मीनल साठे कॉग्रेस कडुन तर शिवसेनेकडुन शहराध्यक्ष शंभु साठे
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा नगरपंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले गेले असुन प्रभाग ४ मध्ये दोन साठे अर्थात भावकी मध्येच राजकीय लढाई लागली आहे. कॉग्रेस-शिवसेना पक्षात दुरंगी लढत होत आहे. नगरपंचायत च्या माजी नगराध्यक्षा अॅड मीनल दादासाहेब साठे या कॉग्रेस पक्षातून तर माढा शिवसेना शहराध्यक्ष शंभु साठे हे शिवसेना पक्षातुन उभे आहेत.कोणत्या साठेंना मतदार पसंती दर्शवतात हे अवघ्या काही दिवसांतच समोर येईल. गत वर्षीच्या निवडणुकीत अॅड मीनल साठे या प्रभाग ५ मधुन निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या.त्यात २८६ इतकी विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी झाल्या होत्या.यंदा मात्र हा प्रभाग ओबिसी प्रवर्गाकरिता राखीव झाल्याने सर्वसाधारण आरक्षित झालेल्या प्रभाग ४ मधुन मीनल साठे निवडणुक लढवित आहेत.गत निवडणुकीत हा ४ प्रभाग साठे गटाच्याच ताब्यात होता.वनिता शहाणे १४४ मतांनी विजयी झाल्या होत्या.शंभु साठे यांनी देखील याच प्रभागातून शिवसेनेतून उमेदवारी दाखल केली.राष्ट्रवादी काँग्रेसचा या प्रभागात उमेदवारच दिलेला नाही.नात्या मध्येच /अर्थात भावकी मध्येच लागलेल्या या राजकीय लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.गत ५ वर्षाच्या कार्यकाळात अॅड मीनल साठे यांनी नगरसेवक,नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळाचा अनुभव घेत विविध नाविन्य पुर्ण उपक्रम कार्यक्रम राबविले आहेत.प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातुन महिलांचे सबलीकरण केले आहे.तर शंभु साठे हे पहिल्यांदाच राजकीय आखाड्यात उतरले असुन ते राजकीय भवितव्य आजमावत आहेत. अॅड.मीनल साठे या ५ वर्षात केलेल्या भरिव विकास कामांच्या जोरावर मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.प्रभागाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी तरुण उमेदवार म्हणुन संधी देण्याचे आवाहन शंभु साठे करताना दिसत आहेत.दोन्ही साठेंचा प्रभागात प्रचार सुरु आहे. माढ्यातील प्रत्येक प्रभागात प्रभावी पणे ठोस विकास कामे झाली आहेत.पायाभूत सुविधांची पुर्तता केल्या आहेत.सर्वात महत्वाचे महिलांच्या कंबरे वरची घागर उतरवली असुन घागर मुक्त,टॅकर मुक्त माढा शहर केले असुन एक दिवसा आड पाणी पुरवठा केला आहे.एक ही दिवस खंड पडु दिलेला नाही.यापूर्वी पाण्यासाठी मोठे हाल महिलांचे होत होते. प्र.४ मध्ये मला गत वर्षी पेक्षा अधिक मताधिक्याने सुज्ञ जनता विजयी करणार आहे.-अॅड.मीनल दादासाहेब साठे,माजी नगराध्यक्षा माढा उमेदवार काॅग्रेस.सध्या मुख्यमंत्री,नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आहे.त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जनता मला तरुण उमेदवार मला विजयी करेल-शंभु साठे,शहराध्यक्ष शिवसेना माढा -उमेदवार शिवसेना ५५३ मतदारांच्या हाती फैसला- प्रभागात महिला २६८,पुरुष २८५ असे एकुण ५५३ मतदार असुन या वार्डाचा नगरसेवक कोण होणार याचा फैसला मतदान करुन देणार आहेत.
0 Comments