Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा मध्यवर्ती कडलास शाखेचा खातेदारांना होतोय मनस्ताप शाखाधिकारी यांचा आडमुठेपणाचा कळस चव्हाट्यावर

  जिल्हा मध्यवर्ती कडलास शाखेचा खातेदारांना होतोय मनस्ताप
शाखाधिकारी यांचा आडमुठेपणाचा कळस चव्हाट्यावर




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा   कडलास या बँकेत ग्राहकांना शाखाधिकारी यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसत असून खातेदार मात्र अचंबित झाले आहेत. मुळातच गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईला आली असून त्यातच शाखाधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे आणि उद्दामपणामुळे  खातेदारांचा किंमती वेळ जातोच, पण बँकेच्या नाकर्तेपणामुळे खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे खातेदार डी सी सी बँक कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या कामकाजावर नाराज संतापल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी खातेदार असून सध्याच्या बँकेच्या प्रशासनावर मी नाराज आहे.शाखाधिकारी तर वयोवृद्ध खातेदारांना व्यवस्थित माहिती देत नाहीत,खात्यावर एवढी रक्कम ठेवा,तेवढीच ठेवा,अर्धा तास थांबा असे सांगून खातेदारांना वेठीस धरले जात आहे.शहाजी  चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते). बँक कर्मचारी आर.बी.आयच्या नियमानुसार काम करताना दिसून येत नाहीत, पण खातेदारांनी अडचणी आणि विविध योजनाची माहिती विचारली असता त्यांना उलटसुलट उत्तरे दिली जात आहेत, नोकरदार वर्गांना कर्जाची भुरळ पाडून त्यांची इच्छा नसताना कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. शासकीय अनुदान जमा होणाऱ्या खातेदारांना बँकेत शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून  हीन वागणूक दिले जात आहे,तर लाखोंचे व्यवहार करणाऱ्या खातेदारांना मात्र सन्मानाची वागणूक दिले जात असल्याची भावना काही खातेदारांनी नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.  शासकीय कर्मचाऱ्यांची पगार बिले कर्मचाऱ्यांनी विचारणा केल्यानंतरच खात्यावर जमा केली जातात.महिला खातेदारांना अर्धा अर्धा तास लंच ब्रेक च्या नावाखाली बँकेत विनाकारण ताटकळत ठेवले जात आहे, पण " बँक शाखाधिकारी महाशय यांना कोण सांगणार की बँकेला लंच ब्रेक नसतो तो, या आणि अनेक कारणांनी अनेक समस्यांच्या गर्तेत डिसीसी बँकेची कडलास शाखा अडकली आहे.जर येणाऱ्या काळात बँक शाखाधिकारी आणि कर्मचारी यांनी आपला कारभार पारदर्शक नाही केला तर नागरिक आणि खातेदार बँकेच्या आणि शाखाधिकारी यांच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा बँकेच्या खातेदारांनी दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कडलास शाखेच्या शाखा व्यवस्थापकामुळे वयोवृद्ध महिला खातेदारांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात आहे. विड्रॉल पास झाल्यानंतर लंच ब्रेक संपेपर्यंत बँकेत थाबवून ठेवले जात आहे. येणाऱ्या काळात सामाजिक,राजकीय महिला संघटनेच्या पदाधिकारी यांच्या कानावर घालून बँकेच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत आहोत.

Reactions

Post a Comment

0 Comments