Ads

Ads Area

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाईफेक करणाऱ्या माथेफिरुवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाईफेक करणाऱ्या माथेफिरुवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी



सांगोला (कटूसत्य वृत्त) :- कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकून अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली.सदर घटनेनंतर संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्याऐवजी या घटनेस किरकोळ घटना म्हणून कर्नाटक राज्याचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही छत्रपती शिवरायांचा अप्रत्यक्षपणे अवमानच केला आहे .यामुळे संपूर्ण राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.राज्यातील शिवप्रेमींच्या ज्वलंत भावना लक्षात घेऊन प्रशासनाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर शाई फेकणाऱ्या समाजकंटकांवर व छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे,शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील ,तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अनिलनाना खटकाळे,जिल्हा परिषद सभापती अनिल मोटे,नगरसेवक सोमनाथ लोखंडे,माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे,नगरसेवक जुबेर मुजावर, माजी नगरसेवक शिवाजी नाना बनकर,माजी नगरसेवक विजय राऊत, माजी नगरसेवक मधुकर बनसोडे,युवा नेते योगेश खटकाळे, तालुका कार्याध्यक्ष विजय पवार, विजय इंगवले,डॉ. राज मिसाळ, लोकनियुक्त सरपंच रामदादा मिसाळ, विनायक मिसाळ,चंद्रकांत चौगुले, सरपंच चंद्रकांत कारंडे,बाळासाहेब शिंदे,गणेश कांबळे,मनोज उकळे, भागवत तंडे ,अरुणभाऊ घुले,सुनील आबा साळुंखे,दत्तात्रय बर्वे, दिलीप नागणे,कैलास खबाले,बाबासाहेब करांडे,सूर्यकांत आदाटे,वस्ताद बंडगर, अजित गोडसे,रवी मस्के,देवा लोखंडे, शिवाजी इंगोले,आदी पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close