कुर्डूवाडीत रेल्वे गेट वरुण उड्डाणपुल करण्याची मागणी आ.संजयमामा शिंदे यांचे मध्यरेल्वेचे जनरल मॅनेजरला पत्र
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कुर्डूवाडी रेल्वे च्या गेट नंबर ३८ मुळे शहराची विभागणी दोन भागात झाली आहे. स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी मार्ग नसल्याने त्वरित रेल्वे गेट वर उड्डाणपुल करण्याच्या मागणी सह करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या पत्रा द्वारे विविध समस्या सोडविण्या संबंधी मध्यरेल्वे मुंबईचे जनरल मॅनेजर यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे मा गण्या करण्यात आल्या आहेत.
चेन्नई मुंबई मेल सह कोणार्क एक्सप्रेस व विशाखापट्टणम एक्स्प्रेस सह इतर महत्त्वाच्या रेल्वेस कायम स्वरूपी थांबा मिळावा,आर.पी.एफ ट्रेनिंग सेंटर च्या जागेचा सदुपयोग करावा,कुर्डूवाडी मालघर कव्हर शेडचे काम त्वरित पूर्ण करावे,सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असे टिकीट दर असलेली पॅसेंजर गाडी त्वरित चालू करावे,किसान रेल सेवा जेऊर स्टेशन वर पुन्हा सुरू करावी,यासह करमाळा विधानसभा मतदार संघा मधील रेल्वे संबंधित विविध विषयाच्या बाबत लोकप्रतिनिधींन सोबत मंडल रेल प्रबंधक सोलापूर यांची बैठक आयोजित करावी,आदी मागणींचे पत्र आमदार संजयमामा शिंदे यांच्या वतीने देण्यात आले आहे.
या बरोबरच डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन वर भेटीचे स्मारक रूपी कोनशिला रेल्वे स्टेशन प्रवेश द्वारा समोर बसविण्यात यावे या मागणींचे निवेदन पंचायत समिती च्या माजी सभापती शीलाताई रजपूत यांच्या पत्राद्वारे प्रा.डॅा.आशिष रजपूत यांनी दिले आहे.
0 Comments