Ads

Ads Area

अभ्यासिकेतून अनेक मोठे अधिकारी घडतील : आ. सुभाष देशमुख सोलापूर सोशल फाउंडेशनच्या अभ्यासिका आणि बुक बँकेचे मोहोळमध्ये उदघाटन

 अभ्यासिकेतून अनेक मोठे अधिकारी घडतील : आ. सुभाष देशमुख
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या अभ्यासिका आणि बुक बँकेचे मोहोळमध्ये उदघाटन



मोहोळ (कटूसत्य वृत्त) वाढत्या स्पर्धेच्या युगात स्पर्धापरीक्षा हा शासकीय सेवेत सहभागी होण्याचा अत्यंत उपयुक्त मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील  विद्यार्थी व विद्यार्थीनींना स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी मोफत अभ्यासिका व बुक बँक सुरू करण्यात आली असुन.त्यांचा जास्तीत जास्त लाभ  विद्यार्थी व विद्यार्थीनींनी घ्यावा असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले .                                       सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने मोहोळ येथील स्व.डॉ.वसंतराव गरड जुन्या दवाखान्याच्या संकुलामध्ये मोफत अभ्यासिका व बुक बँक सुरू करण्यात आली आहे .या अभ्यासिका व बँकेचे उदघाटन फाऊंंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तहसिलदार प्रशांत  बेडसे -पाटील होते. या उपक्रमाला शुभेच्छा देताना तहसिलदार प्रशांत   बेडसे -पाटील म्हणाले की अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असुन आम्हीही या अभ्यासिकेेला  अधुन मधुन भेटी देऊ .तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्य  विद्याार्थना योग्य मार्गदर्शनासाठी  संबधित विषयांच्या  तज्ञांंची मार्गदर्शनपर व्यााख्याने आयोजीत करू. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर, देशभक्त गरड शिक्षण संस्थेचे सचिव प्रतापसिंह गरड , माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, सोशल फांउंडेशनचे जिल्हा सल्लागार  सतीश काळे, वडवळचे शहाजी देशमुख,  नगरसेवक सुशिल क्षिरसागर , विजय कादे , युवराज गायकवाड , श्रीकांत महाराज शिवपुजे, हेमंत शिंदे आदी उपस्थित होते . प्रास्ताविक  सतीश काळे यांनी केले . तर आभार सोशल फाउंडेशनचे जिल्हा सल्लागार शहाजी देशमुख यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास बहुसंख्य पालक व  विद्यार्थी उपस्थित होते.या अभ्यासिकेसाठी  देशभक्त  कै .संभाजीराव गरड बहुउद्देेशिय व विविध संंशोधन संस्थेचे  सचिव प्रतापसिंह गरड यांनी  स्वमालकीची  कै.डॉ. वसंतराव बाबुराव गरड हॉस्पीटलच्या मजल्यावरील इमारत अभ्यासिका व बुक बॅकेसाठी मोफत दिली आहे . काहीनी पुस्तके दिली तर कोणी फर्नीचर दिले.  त्याबद्धल त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे .लवकरच सर्व तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या अभ्यासिका व बुक बँक काढणार असुन अशा कार्याासाठी  दानशुर व्यक्तीसह लोकसहभाग वाढणे गरजेचे आहे . 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close