Ads

Ads Area

दोन तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण

 दोन तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण



           सोलापुर (कटूसत्य वृत्त):-   तृतीयपंथीय यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दिनांक 13/12/2018 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्हयातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारींसंदर्भात तक्रार निवारण समितीची / कक्षाची स्थापना करणे आवश्यक असलेने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दिनांक 07 ऑक्टोबर, 2020 अन्वये तृतीयपंथीय यांच्या प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सोलापूर जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती  गठीत करण्यात आलेली आहे. 

        तृतीयपंथीय यांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत विभाग 6 व 7 नुसार  जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची  तजविज आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत National Portal For Transgender Persons  ही पोर्टल सुरू करणेत आलेली आहे. त्यानुसार प्राथमिक स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे  हस्ते 02 तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी  श्री. कैलास आढे सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर, श्रीमती सिमा किणीकर अध्यक्ष,निरामय आरोग्य धाम, सोलापूर व श्री. उमेश पुजारी तालुका समन्वयक हे उपस्थितीत होते. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर,  यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र तृतीयपंथीय व्यक्तींना  ओळख व  प्रमाणपत्र  मिळविणेसाठी  National Portal For Transgender Persons  या  वेबसाईटवर अर्ज करावेत असे आवाहन  केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close