सांगोला विद्यामंदिरमध्ये लेखक आपल्या भेटीला कार्यक्रमामध्ये लेखिका नीलम माणगावे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 16, 2021

सांगोला विद्यामंदिरमध्ये लेखक आपल्या भेटीला कार्यक्रमामध्ये लेखिका नीलम माणगावे

 सांगोला विद्यामंदिरमध्ये लेखक आपल्या भेटीला कार्यक्रमामध्ये लेखिका नीलम माणगावे 




म.सा.प, सांगोला विद्यामंदिर व लायन्स क्लब सांगोला कडून आयोजन

सांगोला (कटूसत्य वृत्त):-  कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्ष सन (२०२१-२२) निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला,लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे आज सकाळी १०.३० वा. लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमांमध्ये इयत्ता अकरावी मराठी विषयातील 'पैंजण' कवितेच्या लेखिका,कवियत्री,संपादक , बालसाहित्यिक नीलम माणगावे यांचे   पैंजण कवितेवरील भाष्य व विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र  झपके आहेत.पाठ्यपुस्तकातील लेखक प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधणार ही गोष्ट विद्यार्थ्यांना खूप आनंदाची आहे.यानिमित्ताने इयत्ता अकरावी मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांना 'पैंजण' कवितेच्या लेखिका यांच्याशी संवाद साधता येणार आहे.कवितेच्या संदर्भाने  लेखिका माहिती देणार आहेत तसेच कवितेचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व साहित्यप्रेमींनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद सांगोला, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला, लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे कडून करण्यात आले आहे..

                        

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages