Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना ने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह मदत मिळणार-- मुख्याधिकारी कैलास केंद्रे

 कोरोना ने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह मदत मिळणार-- मुख्याधिकारी कैलास केंद्रे



शहरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांस अचूक माहिती द्यावी.

सांगोला (कटूसत्य वृत्त):- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 30-06-2021 रोजी च्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक 11-09-2021 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती covid-19 या आजाराने निधन पावली आहे,  त्या मृत व्यक्तींच्या निकट नातेवाईकास  पन्नास हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य शासनाच्या राज्य आपत्ती मदत निधीतून प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील नगरपरिषद मुख्याधिकारी यांना covid-19 मुळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या निकट नातेवाईकांना सानुग्रह अनुदानाचे वितरण अधिक सुविधाजनक व्हावे, यासाठी त्यांच्या पर्यंत पोहोचून माहिती संकलित करून त्यांना सानुग्रह मदत मिळवून देण्यास सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  कैलास केंद्रे यांनी सांगोला नगरपरिषद कार्यक्षेत्रातील covid-19 मुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना हा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे 10 पथक स्थापन करून कार्यवाही सुरू केली आहे.  सांगोला नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी ज्यावेळेस आपल्या घरी माहिती घेण्यासाठी येतील, तेव्हा त्यांना सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी व सहकार्य करावे. सदर कर्मचारी जेव्हा आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना अर्जदाराचा तपशील, आधार क्रमांक, अर्जदाराचा बँकेचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्ती चा तपशील, त्यांचा आधार क्रमांक ,मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, इतर निकट नातेवाइकांचे ना- हरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र देऊन नातेवाईकांनी सानुग्रह वितरीत करण्याकामी मदत करावी, असे आवाहन मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी शहरातील कोरोनाने निधन झालेल्यांचा नातेवाईकांना केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments