Ads

Ads Area

सांगोला-अकलूज रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार - चेतनसिंह केदार-सावंत

 सांगोला-अकलूज रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार - चेतनसिंह केदार-सावंत 


सर्वेक्षण करण्याच्या सूचना, नागरिकांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार


सांगोला (कटूसत्य वृत्त):-  अकलूज-वेळापूर, वेळापूर-महुद-सांगोला या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग स्तरावर उन्नतीकरण करावे, महूद-सांगोला रोड एनएच 965 जी वरील पुलांची पुनर्बांधणी करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी  केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. तसेच खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय सडक, परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने सांगोला-अकलूज रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला असून या रस्त्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली. सांगोला-अकलूज या 60 किलोमीटरच्या रस्त्यांचा आता विकास होणार असल्याने नागरिकांना उच्च प्रतिचे आणि वेगवान रस्ते मिळणार आहेत.

      नोव्हेंबर महिन्यात पंढरपूर येथे केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची भेट घेऊन सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व पुलांची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात चर्चा केली. पाटस- बारामती- इंदापूर-अकलूज वेळापूर-सांगोला-जत या रस्त्याचे एनएच 965 जी पर्यंत अपग्रेड केले आहे. मात्र अकलूज-वेळापूर हा राज्य महामार्ग असल्याने रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अपग्रेड करणे आवश्यक आहे. सांगोला-जत रस्ता एनएच (पीडब्लूडी) सोलापूरद्वारे दोन लेन व काँक्रीट रस्ता म्हणून विकसित केला आहे. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघातून जाणारा उर्वरित रस्ता 7 मी. रुंदीचा 48 किमीचा रस्ता जडवाहतुकीमुळे खराब आणि खराब झाला असल्याने वारंवार अपघात होत आहेत. तसेच या रस्त्यावरील पूल अरुंद आहेत. त्यामुळे या रस्त्याचे महामार्गात रूपांतर करून अपग्रेड करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अतिरिक्त वार्षिक योजनेंतर्गत वरील रस्ता मंजूर करावा. तसेच पाटस-बारामती- इंदापूर-अकलूज-बोंडले-वेळापूर-सांगोला-जत रस्ता मंत्रालयाने एनएच 965 वर श्रेणी सुधारित केला. या रस्त्यावरील महुद गावाजवळील पूल, चिंचोली तलावाजवळील पूल, वाकी गावाजवळील पुलांची प्राधान्याने पुनर्बांधणी करण्यासाठी आर्थिक वर्ष 2021-22 च्या अतिरिक्त वार्षिक योजनेअंतर्गत वरील रस्ते व पुलांच्या पुनर्बांधणीला मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती.

       खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय सडक, परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने घेतली असून सांगोला-अकलूज रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला आहे. तसेच या रस्त्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली. सांगोला-अकलूज रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार असल्याचे वाहनधारक, नागरिकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सांगोला तालुका आता राष्ट्रीय महामार्गाचा तालुका म्हणून गणला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग सांगोला-अकलूज रस्त्याचा विकास करणार असल्याने त्यांचा दर्जा, गुणवत्ता हा अधिक चांगला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close