विज बीलाबाबत विजयदादांची मध्यस्थीदोन हप्त्यात वीज बील भरण्यास वीज अधिकाऱ्यांची मान्यता
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील वीज बील भरण्यासंदर्भात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अधिकारी व शेतकरी यांच्यात योग्य समन्वय साधून यशस्वी मध्यस्थी केली . वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अधिक ओढाताण न करता समान दोन हप्त्यात वीज बील भरण्यास मान्यता दिली.अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी , पदाधिकारी व शेतकरी यांची बैठक घेण्यात आली . या बैठकीस आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, भाजपा नेते धैर्यशिल मोहीते पाटील, जि. प. सदस्या स्वरुपराणी मोहीते पाटील , सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन ॲड प्रकाशराव पाटील , किशोरसिंह माने पाटील , उपसभापती प्रतापराव पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्ताञय ओमासे, उप कार्यकारी अभियंता प्रविण कुंभारे, भाऊसाहेब मोटे, किरण ङोईफोङे, मुख्य लेखापाल प्रदिप सुरवसे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते . महावितरणच्या अधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीत वीज तोङणीबाबत सामोपचाराने तोङगा काढण्यात आला. आधिका-यांनी दिलेल्या मुदतीत व सवलतीत शेतकरी वीज बिल भरण्यासाठी तयार झाले. त्यामुळे आम्ही आता कोणत्याही शेतक-याची वीज तोङणार नसल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शेतकऱ्यांनी नादुरुस्त रोहीञ, तुटलेल्या तारा, पोल, अनियमित मिळणारी वीज, वाढीव आलेली बिले, कमी अश्वशक्ती असलेल्या मोटारींना जादा अश्वशक्तीची देण्यात येत असलेली बिले अशा अनेक तक्रारी नेते व अधिकाऱ्यांसमोर मांङल्या तर अधिका-यांनी नियमित वीज बिले भरण्याचा आपला हेका लावून धरला. शेतकरी व अधिकाऱ्यांची बाजू ऐकुन घेतल्यानंतर विजयदादा, आ. रणजितदादा व धैर्यशिल मोहीते पाटील यांनी सामोपचाराने तोङगा काढुन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका असे सांगितले. यावर एकरकमी बिल वसूली न करता सवलतीने बिले घ्यावीत. शेतकऱ्यांनी आकङा न टाकता वीज वापरावी व दिलेल्या सवलतीत आणी मुदतीत बिले भरावीत यावर सर्वांचे एकमत झाले. यामुळे बैठकीसाठी माळशिरस तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
तर कठोर कारवाई करणारच…
जे शेतकरी आकङा टाकुन चोरुन वीज वापरताना आढळून येतील अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जे शेतकरी सवलत व मुदत देवूनही वीज बिल भरणार नाहीत अशांचा वीज पुरवठा खंङित करण्यात येईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments