Ads

Ads Area

सोलापूर जिल्ह्यात 15 कोटींचा कर बुडवून धावताहेत वाहने

 सोलापूर जिल्ह्यात 15 कोटींचा कर बुडवून धावताहेत वाहने


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या तब्बल 1 हजार 500 वाहनांचा शोध घेत आहे. जिल्ह्यातील दीड हजार वाहनांकडे तब्बल 15 कोटींचा कर थकीत असल्याने ही वाहने सध्या आरटीओच्या रडारवर आहेत. दोन वायू पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्याद्वारे संबधित वाहनांवर दिसेल तिथे कारवाई करण्यात येणार आहे. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कर थकविणारी दीड हजार वाहने ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आली आहेत. यापूर्वी कर थकविणाऱ्या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयास सहजासहजी मिळत नसे. परंतु, अलिकडील काळात आरटीओ कार्यालयातील कामकाज ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे कर थकविणाऱ्या वाहनांची माहिती तत्काळ समोर येत आहे. त्यातून अशी वाहने ब्लॅकलिस्ट केली जात आहेत. कर थकविलेल्या वाहनधारकांकडून महिना दोन टक्‍के यानुसार वर्षाला 24 टक्‍के कर आकारला जातो. वर्षानुवर्षे कर थकत असल्याने थकबाकी कराचा आकडा वाढतच चालला आहे. कर थकविलेली वाहने देशभरात कुठेही असली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील वाहनमालकांकडे 15 कोटी रुपये वाहन कर थकलेला आहे. या थकबाकीदारांचा शोध आम्ही कायम घेत आहोत. अशी वाहन कुठेही तपासणीत आढळली तर जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे थकबाकीदार वाहनमालकांनी त्यांचा कर त्वरित भरून उपप्रादेशिक कार्यालयास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close