शहरातील सुमारे 8 कोटी 10 लाख रूपयांच्या विकासकामांना सर्वसाधारण सभेमध्ये मिळणार मंजूरी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांची माहिती
सांगोला (कटूसत्य वृत्त):-सांगोला शहरातील विविध विकासकामे घेवून लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने दि. 03 डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अजेंडा काढला असून त्यामध्ये पाणीपुरवठा, बांधकाम, विद्युत व कर विभागाचे एकूण 29 विषय आहेत. तसेच यामध्ये अंदाजपत्रक मंजूरी मिळणार्या विकासकामांची रक्कम सुमारे 8 कोटी 10 लाख रू. असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली. यामध्ये तेली ताल ते कोपटेवस्ती रस्ता डांबरीकरण करणे- कामाची रक्कम 35 लाख 20 हजार 905 रू, मारूती मंदिर ते गजानन घोंगडे दुकान ते परिटगल्ली ते महादेव मंदिर ते वेसपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे- कामाची रक्कम 11 लाख 02 हजार 043 रू, महात्मा फुले भाजी मंडई परिसरात बाजार कट्टे बांधणे व पहिल्या मजल्यावरती बहुपयोगी सभागृह बांधणे- कामाची रक्कम 2 कोटी रू, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धान्य बाजार येथे नवीन व्यापारी संकुल बांधणे- कामाची रक्कम 3 कोटी रू, कडलास रोड ते डॉ. कुरे-जरे घरापर्यंत बंदिस्त गटार व रस्ता मुरमीकरण, खडीकरण व डांबरीकरण करणे, सनगर गल्ली येथील मुहम्मदिया अरबी मदरसा समोर न.प.च्या जागेत पेव्हींग ब्लॉक बसविणे कामासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, सांगोले नगरपरिषदेसाठी स्ट्रक्चरल डिझायनर यांची पॅनलवर नेमणूक करणे, सांगोले नगरपरिषदेसाठी सल्लागार अभियंता यांची पॅनलवर नेमणूक करणे, शिंगाडेवस्ती जाणार्या रस्त्यावर सीडी वर्क करणे- कामाची रक्कम 2 लाख 54 हजार 183 रू, राऊतमळा रस्ता कॅनॉल ते डॉ. माळी घर ते भारत माळी रस्ता मुरमीकरण करणे, भोकरेवस्ती येथे कोपटेवस्ती क्रॉस रस्ता ते भोकरेवस्ती समाजमंदिरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे- कामाची रक्कम 8 लाख 40 हजार 109 रू, कडलास रोड ते डॉ. सचिन गवळी हॉस्पिटल पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे- कामाची रक्कम 9 लाख 30 हजार 442 रू, शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेसमोरून सकट यांचे घरापर्यंत आरसीसी गटार करणे- कामाची रक्कम 36 लाख 28 हजार 643 रू, विद्यानगर कॉलनी येथे हणमंत देशमुख घराजवळील बोळातील रस्त्यावर पेव्हींग ब्लॉक बसविणे- कामाचे रक्कम 3 लाख 86 हजार 589 रू, शाडू विहीर ते इनामदार घर ते लेंडवे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे- कामाची रक्कम 22 लाख 63 हजार 775 रू, कोपटेवस्ती ते ओढ्यापर्यंत आरसीसी गटार करणे- कामाची रक्कम 66 लाख 78 हजार 554 रू, गायकवाड वस्ती ते बिलेवाडी पर्यंत आरसीसी गटार करणे- कामाची रक्कम 56 लाख 15 हजार 988 रू, यगनशा बाबा दर्गा सभोवती पेव्हींग ब्लॉक बसविणे- कामाची रक्कम 4 लाख 43 हजार 581 रू, पुजारवाडी येथील सुधीर आहेरकर घर ते दिपक शिंदे घर ते बाळू जाधव घर ते नंदू जाधव घर ते मारूती बनकर घर ते पुजारवाडी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूंनी काँक्रीट गटार व रस्ता डांबरीकरण करणे- कामाची रक्कम 43 लाख 51 हजार 239 रू. हे बांधकाम विभागाचे विषय घेण्यात आले असून पाणीपुरवठा विभागाकरीत विविध प्रकारचे साहित्य खरेदी करणे, नगरपरिषदेकडील जुने जलशुध्दीकरण केंद्र इमारतीस रंग देणे, नगरपरिषदेकडील इसबावी पंपहाऊस येथील 270 व्ही.टी. पंप क्र. 1 चे कॉलम पाईप बदलणे, सन 2022-23 करीता पाणीपुरवठा योजना चालविणे व देखभाल दुरूस्ती करणे इत्यादी कामे वार्षिक ठेक्याने देणे, शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन टाकणे- यामध्ये कडलास रोड शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज ते बाबर वस्तीपर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, एखतपूर रोड बनकरस्ती कॅनॉल ते विष्णूपंत बनकर घर ते अभिजीत मस्के घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, वासूद रोड पश्चिम बाजूस सुदर्शन ढाब्याजवळीज फिरोज मुलाणी घर ते अशोक शंकर मोरे घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, पंढरपूर रोड ते प्रा. शरद पवार घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, पंढरपूर रोड ते प्रशांत देशमुख घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, पंढरपूर रोड ते भोकरेवस्ती नवीन पाण्याची वितरण नलिका टाकणे, पंढरपूर रोड ते रेल्वे लाईनच्या पश्चिमेस बाबूराव देशमुख घर ते रंगनाथ देशमुख घर ते अशोक देशमुख घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, भोकरेवस्ती जाणारे पाईपलाईन वरून संजय गुजर घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, देशमुख वस्ती ते आनंदा साळुंखे घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, राऊत मळा येथील तानाजी राऊत घर ते विलास राऊत घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, बिलेवाडी येथे अक्षय वाघमोडे घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, बिरू शिंगाडे घरापासून बंडू व्हटे घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, कडलास रोड सांगोला कॉलेजच्या दक्षिण बाजूस पाण्याची टाकी ते सचिन कोडग घरापर्यंत पाईपलाईन टाकणे, नारायण बामणे घरापासून केशराबाई इंगोले ते विशाल देशमुख, बंडू इंगोले, अशोक देशमुख घरापर्यंत पाईपलाईन टाकणे, सिध्दनाथ मंदिर ते माळवाडी येथील लिंगे घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, वाढेगांव रोड बंधन पॅलेस पाठीमागे बिरूदेव गेजगे घर ते भागव बनसोडे घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, चिंचोली रोड येडगे वस्ती येथे हणमंत जाधव घर ते बाळू येडगे घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका टाकणे, चांडोलेवाडी पंपहाऊस करीता नवीन ट्रान्सफार्मर बसविणे, जलशुध्दीकरण केंद्र इमारतीचे आवारात पेव्हींग ब्लॉक बसविणे कामाची रक्कम- 9 लाख 97 हजार 870 रू हे विषय पाणीपुरवठा विभागातंर्गत घेण्यात आले आहेत. तसेच संजय देशमुख (देशमुखवस्ती) येथे विजेचे 2 पोल टाकणे, शुभम विजय देशमुख यांचे घरासमोर विजेचे 2 पोल टाकणे, भोकरेवस्ती लंबे घर ते तानाजी बिले घरापर्यंत 4 विद्युत पोल टाकणे, कोपटेवस्ती येथे प्रा. शरद पवार घरासमोर 2 विद्युत पोल टाकणे, कोपटेवस्ती येथे मधुकर मुरलीधर पोळ यांचे घरासमोर 2 विजेचे पोल टाकणे, देशमुख वस्ती येथे महादेव शिंदे घरापासून रावसाहेब देशमुख घरापर्यंत विजेचे 5 पोल टाकणे, पंढरपूर रोड चंद्रकांत जानकर घरापर्यंत विजेचे 5 पोल टाकणे, साळुंखे वस्ती येथे मेजर साळुंखे घरापर्यंत विजेचे 10 पोल टाकणे, भोकरेवस्ती येथे सीताराम वाघमारे घरापर्यंत विजेचे 3 पोल टाकणे, भोकरेवस्ती रस्त्यापासून संजय भोकरे घरापर्यंत विजेचे 5 पोल टाकणे, देशमुख वस्ती येथे अर्जुनराव देशमुख घरापर्यंत विजेचे 3 पोल टाकणे, मणेरी वस्ती येथे अख्तर मणेरी घरासमोर विजेचे 3 पोल टाकणे हे विद्युत विभागाकडील विषय आहेत. कर विभागाकडील सांगोले नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्य देणे हा विषय घेण्यात आला आहे. तर सांगोले नगरपरिषद पॅनलवरती वकीलाची नेमणूक करणे हा विषय सुध्दा घेण्यात आला आहे.
या सर्व विषयांना सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरी मिळाल्यानंतर निश्चितच पुढील कार्यवाही करून ही सर्व कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन सुध्दा यावेळी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिले.
राणीताई माने सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपरिषदेच्या महात्मा फुले भाजी मंडई परिसरात बाजार कट्टे बांधणे व पहिल्या मजल्यावरती बहुपयोगी सभागृह बांधणे व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धान्य बाजार येथे नवीन व्यापारी संकुल बांधणे या कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी दिला, त्याबद्दल आम्ही सर्व सदस्य त्यांचे आभारी आहोत. शोभाकाकी घोंगडे, पाणीपुरवठा सभापती
0 Comments