भाजपा जिल्हाध्यक्षांची जिल्हाभर 'टिमटिम',मात्र स्वतःच्या गटात भाजपा सक्षम करण्यात अपयशी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे जिल्हाभर महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक पणे भाषणे देत आहेत,महाविकास आघाडीच्या विरोधात मोर्चे,निदर्शने,आणि आंदोलने करीत टिमटिम करीत आहेत.पण खुद्द जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या जवळा गावात आणि गटात भाजपा पक्ष किती सक्षम केला आहे ?प्रश्न इतर तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना सतावत आहे.
जिल्ह्यातील 8 आमदार आणि दोन खासदार हे भाजपाचे आहेत.पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने गावपातळीवरून भाजपा पक्ष वाढवा ,संघटन करा,बुध यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना दिल्या असताना सांगोला शहर आणि तालुक्यातील काही मोजक्याच गावात या वर कार्यवाही सुरू आहे. खुद्द जवळ्यात मात्र या पैकी कुठलीच कार्यवाही होताना दिसत नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. भाजपा जिल्ह्यात वाढविण्यासाठी सर्व बाजूनी पोषक वातावरण असताना भाजपा जिल्हाध्यक्ष मात्र स्वतःच्या गावात भाजपाचा बलशाली गट बनविण्यास अपयशी ठरत असल्याचे खुद्द जवळा गावांतून नागरिकांतून बोलले जात आहे.
स्वतःच्या गावात आणि गटात आपल्या पक्षाचा झेंडा मजबूत राखण्यास अपयशी ठरलेल्या भाजपा अध्यक्ष श्रीकांत देशमुख मात्र जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आंदोलनात,मोर्चात आक्रोश करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत चार सदस्य हे फक्त भाजपा आणि शेकाप पुरस्कृत आहेत.अख्या जवळा जि प गटातील जवळा गाव सोडले तर एकाही गावात एकही ग्रामपंचायत सदस्य नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष मात्र स्वतःचा दबदबा स्वतःच्या गावात निर्माण करण्यात अपयशी ठरले असल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
येणाऱ्या काळात तरी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी स्वतःच्या गटात,नगरपालिकेत आणि इतर गटात,आणि गणात सक्षम भाजपा करण्यासाठी प्रयत्न करावा,अशी अपेक्षा भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
0 Comments