DVP पिपल्स मल्टीस्टेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल दि पिपल्स मल्टीस्टेट, मोहोळ येथे शाखेचा उदघाटन समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 18, 2021

DVP पिपल्स मल्टीस्टेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल दि पिपल्स मल्टीस्टेट, मोहोळ येथे शाखेचा उदघाटन समारंभ संपन्न

 DVP पिपल्स मल्टीस्टेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल
दि पिपल्स मल्टीस्टेट, मोहोळ येथे शाखेचा उदघाटन समारंभ संपन्न




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- DVPउद्योग समूहाचे व धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून DVP उद्योग समूहाची झेप ही सहकार क्षेत्रात कार्यरत असून आता अर्थकारणात पाऊल टाकत आज मोहोळ येथे श्री नागनाथाच्या पावन नगरीत दि पिपल्स मल्टीस्टेट या नवीन शाखेचे उद्घाटन नागनाथ महाराजाचे प.पु.राजेंद्र खर्गे महाराज, मोहोळचे मा. आमदार राजन पाटील, मा.जि.प.उपाध्यक्ष दिपक गायकवाड, पद्माकर आप्पा देशमुख, मा.उपसभापती बाळासाहेब गायकवाड, प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, नगरसेविका सौ. सिमाताई पाटील, लोकसेवक संजय शिरसागर, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, नगराध्यक्ष शौकीन तलफदार, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके,भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, प्रवीण डोके आदीच्या शुभहस्ते करण्यात आले. 
बँकेच्या माध्यमातून अधिक तरूणांना रोजगार व उद्योग उभारणीस मदत होईल. नागरिकांचे हित समोर ठेवून विविध योजना राबवण्यात येतील. ऑनलाईन बॅकींग हि सुरू ठेवण्यात आले आहे. बँकेचा ठेवीचा व्याजदर हा अधिक असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी ठेवी द्याव्या यामुळे मोहोळ नगरी व आजूबाजूच्या गावांचे अर्थकारण नक्कीच सुधारणीत हातभार लागेल असे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमनश्री.अभिजीत पाटील म्हणाले. 
याप्रसंगी धाराशिव साखर  कारखान्याचे संचालक रणजीत भोसले, संदीप खारे, सुहास शिंदे, आबासाहेब खारे, दीपक आदमिले, दिनेश शिळ्ळे, जंयत सलगर, मल्टीस्टेटचे चेअरमन संदेश दोषी,  सुरज पाटील, श्रीनिवास बोरगावकर, सचिन खरतडे, महेश जावळे, कुलदीप कौलगे, तसेच मोहोळ मित्र परिवार उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages