Hot Posts

6/recent/ticker-posts

सुदीप चाकोते ऑल इंडिया स्तरावर चमकतील : सुशिलकुमार शिंदे

 सुदीप चाकोते ऑल इंडिया स्तरावर चमकतील : सुशिलकुमार शिंदे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरातील चाकोते घराणे नेहमी आमच्या पाठीशी राहिले आहे. आम्हीही सदासर्वदा या परिवाराच्या पाठीशी राहिलो आहोत.सुदीप चाकोते हे दूरदृष्टीचा विचार करणारे नेतृत्व आहे. आगामी काळात ते ऑल इंडिया स्तरावर चमकतील असा विश्‍वास देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्‍त केला.
महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाच्या प्रदेशाध्यक्षदी सुदीप चाकोते यांची निवड झाल्याने मंगळवारी दुपारी रेवणीसिध्देश्‍वर मंगल कार्यालयात त्यांचा नागरी सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. लोकनेते स्वर्गीय बाबुराव आण्णा  चाकोते प्रेमी व सोलापूर शहर उत्‍तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकत्यार्ंच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, सुदीप चाकोते दिलेली जबाबदारी निष्ठेने पुर्ण करतात.कोविड काळात त्यांनी केलेले कार्य तर अतुलनिय असेच आहे.त्याला तोडच नाही.त्यांच्यात राज्य,राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. दिल्‍ली त्यांच्यासाठी वाट पाहत आहे अशी प्रेरणा शिंदे यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री मधूकरराव चव्हाण, सिध्दाराम म्हेत्रे, आ.प्रणिती शिंदे, सिध्दाराम चाकोते, शहराध्यक्ष प्रकाश वाले, चेतन नरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री चव्हाण म्हणाले, चाकोते घराण्याशी आमचे फार जुने संबध आहेत.कै.बाबुराव आण्णा यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेत समाजहिताचे काम केले.काँग्रेस सेवादलातूनच देशाचे नेतृत्व तयार झाले. सेवादल आणखीन बळकट करण्याचे काम सुदीप यांनी करावे.
माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले, पंडित नेहरु, इंदिरा गांधी हे काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष होते. सेवादलामुळेच देशात राजकारणाला चांगली दिशा मिळाली.सुदीप चाकोते यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड कौतुकास्पद असून क्रांती घडविण्याचे काम त्यांच्याकडून व्हावे.
माजी मंत्री म्हेत्रे म्हणाले, सुदिप चाकोते यांच्या कार्यपध्दतीमुळेच त्यांना प्रदेशस्तरावरील पद मिळाले.सेवादलाच्या धर्तीवरच आरएसएसचे काम चालते.आरएसएसला मोडून काढण्यासाठी सेवादलच पर्याय योग्य ठरणार आहे.सेवादलाच्या माध्यमातून समाजकार्य करणार्‍या युवकांची फळी निर्माण व्हावी.
यावेळी माजी आमदार चाकोते म्हणाले,स्वातंत्र्य चळवळीत सोलापूरातील हुतात्म्यांचे  योगदान आहे. सिद्रामप्पा चाकोते व संगव्वा चाकोते यांनाही इंग्रजांनी विजापूरच्या जेलमध्ये सिमेंट खाउ घातले होते. स्वातंत्र्य सैनिकांचे हे योगदान अविस्मरणीय आहे. सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री पदावर असताना व महापौर असताना सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनचे काम करण्यात आले. चाकोते घराण्याची नाळ तळागळातील  सर्वसामान्यांशी जुळली आहे.
यावेळी सत्काराला उत्‍तर देताना सुदीप चाकोते म्हणाले, सुशिलकुमार शिंदे हे अत्यंत मायाळू स्वभावाचे आहेत. आ.प्रणिती शिंदे या काळानुसार आक्रमक आहेत. आगामी महापालिका निवडणूकीत महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावूनच तुमच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा वाढदिवस पार्क मैदानात साजरा करु असा विश्‍वास त्यांनी सुशिलकुमार शिंदे यांच्या समोर व्यक्‍त केला.
प्रारंभी फांउडेशनचे अध्यक्ष विश्‍वशंकर चाकोते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, सकलेश चाकोते ,पैगंबर सय्यद यांनी मनोगत व्यक्‍त केले. या कार्यक्रमास अंबादास गुत्‍तीकोंडा, केदारनाथ उंबरजे,संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार आदीसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments