लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात केली औषध फवारणी
सांगोला (कटूसत्य वृत्त):- लक्ष्मीनगर ग्रामपंचायत यांच्यावतीने नुकतीच गावामध्ये किंगफॉंग लिक्विड आणि डिझेल पेट्रोल मिक्स करून डास प्रतिबंधात्मक लिक्विडची फवारणी केली. सदर फवारणी करण्यापाठीमागचा उद्देश की गावातील नागरिकांना साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.नागरिकांनी आपल्या परिसरातील आणि अंगणातील पाणी साठविण्याची पद्धती बदलून जास्तीत जास्त पाणी निर्जुतिकीकरण करून वापरण्यात यावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती केली जात आहे. नक्कीच ही फवारणी केल्याने ग्रामस्थांतून ग्रामपंचायतीचे आभार मानले जात आहे.
सदर फवारणी करणेकमी सरपंच धनाजी बाड, उपसरपंच सौ स्वाती साठे,ग्रामपंचायत सदस्या सविता नितीन नरळे,मंदाताई रामचंद्र गोडसे,ग्रामपंचायत सदस्य धर्मराज ऐवळे,ग्रा सदस्या राणी दीपक बाड, मीनाक्षी बालाजी नरळे,यांचे सहकार्य लाभले .तर ग्रामपंचायत शिपाई मुबारक मुलाणी,पाणीपुरवठा कर्मचारी कुंडलिक जावीर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments