जिल्हा शल्य चिकित्सक यांची ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट
एका महिलेची केली यशस्वी सिझेरियन प्रसुती
सांगोला(कटूसत्य वृत्त) :- दि ११ ऑगस्ट २०२१रोजी ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले व जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर यांनी अचानक भेट दिली.या वेळी त्यांनी डीसीएचसी सेंटर मध्ये जाऊन कोरोना रुग्णाची विचारपूस केली .व रुगणाशी चर्चा करून दिल्या जाणाऱ्या सुविधा बाबत विचारपूस केली.तसेच सेंट्रल ऑक्सीजन लाईनच्या कामाची पाहणी केली .लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लॅण्टच्या जागेची पाहणीही या वेळी करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या भेटीमध्ये सिझेरियन प्रसूती करिता ऍडमिट रुग्णाची स्वतः सिझेरियन करून प्रसुती करण्यात आली. सदर प्रसूती करिता भुलतज्ञ डॉ उत्तम फुले व स्त्री रोग तज्ञ डॉ पूजा साळे यांनी सहकार्य केले .जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सिझर केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचा शाल श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . ट्रामा केअर सेंटरचे बाधकाम चालू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काही ठिकाणी बदल करण्याच्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या .सदर बैठकीमध्ये कोव्हिड टेस्टिंग , डिलिव्हरी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व साथ रोगाचा आढावा घेण्यात आला .सदर भेटीदरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम फुले, डॉ वंदना चाकणे,डॉ पूजा साळे,डॉ देशमुखे,डॉ निशिकांत पापरकर ,अरुण जाधव,व रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
0 Comments