Hot Posts

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सांगोला तालुक्यातील १४ केंद्रावर तयारी पूर्ण - तालुका समन्वय अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर

 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सांगोला तालुक्यातील १४ केंद्रावर तयारी पूर्ण - तालुका समन्वय अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर



पाचवीचे -९ केंद्रातून १४०८ विद्यार्थी तर आठवीचे  -५ केंद्रातून ७१८ विद्यार्थी देणार परीक्षा.

सांगोला (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा  दि १२.ऑगस्ट२०२१ रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी सांगोला तालुक्यातील इयत्ता पाचवी साठी एकूण नऊ केंद्र व इयत्ता आठवी साठी पाच केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी साठी एकूण १४०८ विद्यार्थी समाविष्ठ झाले आहेत.त्यांची परीक्षेची  १. चिंचोली माध्यमिक विद्यालय चिंचोली २.जवाहर विद्यालय घेरडी ३.कै.सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय जवळे ४.आनंद विद्यालय कमलापूर ५. पांडुरंग विद्यालय कटफळ ६.विद्यामंदिर हायस्कूल कोळा ७.श्री. शिवाजी विद्यालय महूद ८.नाझरा विद्यामंदिर नाझरा ९. न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच इयत्ता आठवी साठी एकूण ७१८ विद्यार्थी समाविष्ट झाले आहेत. त्यांची परीक्षेची १.श्रीराम विद्यालय हातीद २.देशभक्त कै.संभाजीराव शेंडे विद्यालय मेडशिंगी ३.शिवणे हायस्कूल शिवणे ४.सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर ५.सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी बैठे पथक व भरारी पथकाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. एकूण चौदा केंद्रासाठी १४ केंद्रसंचालक व १०८ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यात आलेली आहे. प्रत्येक पर्यवेक्षक यांचेकडे hand sanitizer देण्यात आलेले आहे. प्रत्येक पेपरला वर्गात प्रवेश करताना सर्व विद्यार्थ्यांचे hand sanitizer करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने तोंडाला मास्क लावून व सामाजिक अंतर ठेऊन परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करावा.  असे आवाहन तालुका परीक्षा समन्वयक तथा उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर संजय जावीर यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments