नगरसेवक आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त मुजावर गल्ली येथे वृक्षारोपण संपन्न
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषदेचे महायुतीचे गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त मुजावर गल्ली याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली. तसेच पंढरपूर रोड येथील महावितरण कार्यालय आवार आणि आनंदनगर मणेरी वस्ती याठिकाणीही वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, तोहीद शेख, मकबूल शेख, जमीर मुजावर, तोफिक मुजावर, खलील मुजावर, शकील मुजावर, रऊफ मुजावर, इनुस मुजावर (गुरुजी), सुहेल इनामदार, सल्लाउद्दीन शेख, जाकीर मुजावर, इस्लाम मुजावर, अश्रफ मुलाणी तसेच महिला वर्ग उपस्थित होते.
0 Comments