रोटरी क्लबच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमाला भांड्यांचा संच प्रदान
सांगोला (जगन्नाथ साठे):- सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रमाला सामाजिक कार्यात आतंरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या रोटरी क्लबच्या सांगोला येथील रोटरी क्लब च्या वतीने नुकताच भांड्यांचा सेट भेट देण्यात आला. या कार्यक्रमास रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष डॉ प्रभाकर माळी, रोटरी सदस्या प्रतिमा माळी यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले.प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय म्हेत्रे व सचिव श्रीपती आदलिंगे यांच्या हस्ते भांड्यांचा संच मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सदस्य इंजि मधुकर कांबळे,इंजि हमीद शेख, प्राचार्य साजिकराव पाटील,प्रविण मोहिते, दीपक चोथे, विकास देशपांडे, नीलकंठ लिंगे, दत्तात्रय पांचाळ संतोष घुमरे, सचिन पाटकूलकर, संतोष गुळमिरे, सचिन पाटील, अरविंद डोंबे यांच्यासह वृद्धाश्रमातील अधिकारी, पदाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल जाधव यांनी केले तर अध्यक्ष विजय म्हेत्रे व सचिव आदलिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काकडे गुरुजी यांनी आभार मानले.
0 Comments