राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुरग्रस्तांना मदतीचा हात

सांगोला (कटूसत्य वृत्त):- कोकणात तसेच सांगली कोल्हापूर परिसरात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील नद्यांना महापूर आला होता. पुरामुळे या परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे सर्व पदाधिकारी व नागरिकांना आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महिला आघाडीच्या वतीने पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे. गुरुवार दि 29 रोजी पूरग्रस्तांना मदत करणारा टेम्पो पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड, सांगोला विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा सुचीता मस्के, तालुकाध्यक्षा सखुबाई वाघमारे, शहरअध्यक्षा शुभांगीताई पाटील उपाध्यक्षा मंगल खाडे, हसीना मुलाणी, संगीता पाखरे, शकुंतला खडतरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा अंकिता शिंदे, शहराध्यक्षा प्राजक्ता पाटील जिल्हा उपाध्यक्षा प्रज्ञा कांबळे आदी महिला पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, शिवाजी बनकर, पियुष साळुंखे पाटील, यशराजे साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सोमनाथ लोखंडे, योगेश खटकाळे, बाळासाहेब साळुंखे, दिलीप मस्के, नगरसेवक जुबेर मुजावर, आलमगीर मुल्ला, विजय राऊत, चंचल बनसोडे, रवी चौगुले, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणसह कोल्हापूर व सांगली परिसरात नद्यांना महापूर आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील सामान्य लोकांना मदतीची नितांत आवश्यकता असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील सर्व घटकांनी अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करावी असे शरदचंद्रजी पवार यांनी आवाहन केले होते. यानुसार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम दिपकआबा साळुंखे पाटील व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राज्याच्या उपाध्यक्षा जयमलाताई गायकवाड यांनी सांगोला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडीच्या वतीने पूरग्रस्त भागातील महिलांसाठी साड्या, चादरी, तसेच सतरंज्या व जीवनावश्यक वस्तूची मदत पाठविण्यात आली.
यावेळी बोलताना जयमालाताई गायकवाड म्हणाल्या, अचानक आलेल्या महापुरामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशावेळी संकट काळात खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने एक कर्तव्य या नात्याने आम्ही साड्या, चादरी, सतरंज्या तसेच जीवनावश्यक किराणा साहित्याचे मदत पाठवली आहे. यापुढील काळातही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गरजूंना मदत करण्याचे कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माध्यमातून निरंतर सुरू ठेवले जाईल असेही शेवटी जयमालाताई म्हणाल्या.मदत नव्हे हे तर आमचे सामाजिक कर्तव्य देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महिला आघाडीच्या वतीने आपण पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे. समाजातील प्रत्येकाने अशा प्रसंगी पुढे येऊन पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला पाहिजे. अशा काळात गरजूंना केलेली मदत म्हणजे आपले सामाजिक कर्तव्य असते. म्हणून मदत नव्हे तर आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील
0 Comments