टेंभुर्णी- कुर्डूवाडी रोड वरील हॉटेल-चालक मालक यांचे कडून पूरग्रस्तांसाठी मदत.

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- येथील कुर्डूवाडी बायपास जिजाऊ चौक येथील हॉटेल चालक- मालक यांचे कडून माजी उपसभापती तुकाराम ऊर्फ बंडू नाना ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवतेच्या दृष्टिकोनातून कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत किराणा माल व ईतर गृहोपयोगी वस्तू सर्वच्या सहकार्याने जमा करून त्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तात्काळ पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आल्या या वेळी कुर्डूवाडी बायपास येथील हॉटेल चालक अणि मालक नागनाथ भाऊ खटके,संतोष बापु खटके , गोरख खटके सर, डॉ मनोज काळे,बाळासाहेब ढगे,भारत इंगळे,बाळासाहेब चव्हाण,रवी खटके,राजकुमार खटके,बालाजी महाडिक.सागर महाडिक सुरज तांबोळी, अंकुश कुटे, खडके, आदी उपस्थित होते.
टेंभुर्णी पो. स्टे. उपनिरीक्षक सुनील जाधव हॉटेल व्यावसायिक हे करोना साथीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आहेत तरी सुद्धा आपले दुख व अडचणी बाजूला ठेवून या सर्व हॉटेल चालक व मालक यांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे हे खरच कौतुकास्पद आहे"तरी टेंभुर्णी पोलीस स्टेशन च्या वतीने मी पूरग्रस्तांसाठी पाच हजार रुपयेचे तांदूळ, गहू घेण्यासाठी रोख रक्कम देऊन फूल नाही फुलाची पाकळी ची मदत करत असल्याचे सांगितले
0 Comments