अकलूज उपप्रादेशिककार्यालयाकडून शिबीराचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

अकलूज उपप्रादेशिककार्यालयाकडून शिबीराचे आयोजन

 अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शिबीराचे आयोजन



 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूबाबतच्या सूचनांचे पालन करून ऑगस्ट 2021 या महिन्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.शिबीरासाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्कचा वापर, विल्हेवाट लावण्याजोगे हातमोजे आणि सॅनिटायझर घेऊन यावे. शिबीरामध्ये एकमेकापासून सहा फुटाचे अंतर ठेवावे. पक्क्या परवान्याची चाचणी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर घेताना एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करून दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

              हे शिबीर मोडनिंबमध्ये उपविभागीय अभियंता, सीना-माढा प्रकल्प उपविभाग-4 यांचे सांस्कृतिक भवन-13 ऑगस्ट, माढा शासकीय विश्रामगृह-17 ऑगस्ट, सांगोला शासकीय विश्रामगृह-20 ऑगस्ट, कुर्डूवाडी शासकीय विश्रामगृह-23 ऑगस्ट, टेंभुर्णी शासकीय विश्रामगृह येथे 26 ऑगस्ट आणि करमाळा शासकीय विश्रामगृह-30 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages