Hot Posts

6/recent/ticker-posts

राजकारणातील देवमाणूस हरपला" विश्वविक्रमी माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

 राजकारणातील देवमाणूस हरपला
विश्वविक्रमी माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन



सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यावर तब्बल पंचावन्न वर्ष अधिराज्य गाजविणारे शेकाप पक्षाचे विश्वविक्रम माजी आमदार डॉ गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.संसदीय कार्याच्या बाबतीतील ज्येष्ठ अनुभवी राजकारणी हरपल्याची भावना राजकीय जाणकारातून बोलली जात आहे.त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यातील एक अभ्यासू,चाणाक्ष, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व महाराष्ट्रातुन निघून गेले आहे.त्यांच्यावर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते,अखेर शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली.शेकाप पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी नुकतीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
        अत्यंत शांत,संयमी,आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण राज्याला त्यांचा परिचय होता.सांगोला तालुक्यातील अनेकांनी त्यांच्या निधनाची बातमी समजताच  हंबरडा फोडला.माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सांगोला तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच मतदार संघातून तब्बल अकरा वेळा त्यांनी विजयी संपादन करून विश्वविक्रम केला आहे.त्यांनी मंत्रिपद ही भूषविले होते.त्यांच्या निधनाने राजकारणातील देव माणूस हरपल्याची भावना राजकीय जाणकारातून बोलली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments