सांगोला शहरातील मुस्लीम समाजाच्या ईदगाह मैदान सुशोभिकरणासाठी आमदार ॲड शहाजीबापू पाटील यांच्याकडून २५लाख निधी मंजूर

मुस्लीम समाजाची गेल्या ३०वर्षापासूनची मागणी होणार पूर्ण
सांगोला (कटुसत्य वृत्त) : मागील तीस वर्षापासून मागणी असलेल्या मुस्लीम समाजाच्या ईदगाह मैदान सुशोभिकरणाचे काम आता पूर्ण होणार असून यासाठी सुरुवातीच्या संरक्षण भिंत व सुशोभिकरणाच्या कामाला प्राथमिक निधी म्हणून २५ लाख रुपये मंजूर करीत असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जाहीर केले.
ईदगाह मैदानासाठी नगरपालिकेकडून आरक्षित असलेल्या ५७गुंठे क्षेत्राची मोजणी करून हद्दी खुणा कायम करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेले वर्षभर पाठपुरावा केला होता. नुकतीच या जागेची रीतसर मोजणी होऊन हद्दी खुणा कायम करून या जागेचा नकाशा नगरपालिकेला मिळाला आहे या जागेमध्ये कोण -कोणत्या सोई-सुविधा करावयाच्या आहेत यासाठी विचार -विनिमय करण्यास सांगोला शहरातील सर्व मुस्लिम नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक यांची बैठक आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलविली होती. या बैठकीला माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, प्रा पी सी झपके, बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील, रफिक नदाफ,ॲड उदयबापू घोंगडे, यांच्यासह नगरसेवक जुबेर मुजावर, अस्मीर तांबोळी, रफिक तांबोळी,सोमनाथ लोखंडे, अनिल खडतरे,हाजी शब्बीरभाई खतीब, दिलावर तांबोळी, युसुफ मुलाणी, शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब,तोहीद मुल्ला,आलमगीर मुल्ला, सागर पाटील, आनंद घोंगडे,पत्रकार हमीदभाई इनामदार, निसार तांबोळी, पोपट खाटीक,यांच्यासह बहुसंख्य प्रतिष्ठित मुस्लिम बांधव हजर होते.
सुरुवातीला ईदगाह मैदानाची मोजणी करून नकाशा मिळाले ची माहिती नगरपालिकेचे अभियंता lआकाश करे यांनी दिली यावर प्रा पी सी झपके यानी मुस्लिम समाजाची गेल्या ३० वर्षांची मागणी असलेल्या ईदगाह मैदानाची जागा मोजणी करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाठपुरावा करून पूर्ण केली आहे आत्ता या कामासाठी भरघोस आमदार निधी देण्याची मागणी झपके यानी केली.
हाजी शब्बीरभाई खतीब यांनी सांगितले मी गेल्या तीस वर्षापासून सर्वच नेत्यांना वारंवार भेटून या जागेची मागणी करीत होतो परंतु आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्या पासून याचा पाठपुरावा करून मोजणी करून घेतली याच्या कामाकरिता २५लाख रुपये आमदार निधी मंजूर केल्या बद्दल शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मी शहाजीबापूंचे आभार मानत असल्याचे सांगितले व ईदगाह मैदानामध्ये कुंपणभिंत, गेट, तारतखाना, स्टोअर रूम यासह हायमास्ट दिवे आणि पेव्हिंग ब्लॉग बसवून देण्याची मागणी केली.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी मुस्लीम समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी आणि आमदार शहाजीबापू पाटील कटिबद्ध असून या मैदानाच्या कामाबरोबर मुस्लिम स्मशानभूमीची वाढीव जागा मिळवून देण्यासाठी आम्ही दोघे प्रयत्न करून ही जागा मिळवून देऊ असे सांगितले
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की मला आमदार निधीतून एका कामाकरता जास्तीत जास्त २५ लाख रुपये देता येतात त्यामुळे मी या वर्षाच्या आमदार निधीतून २५ लाख रुपये ईदगाह मैदानाच्या संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी मंजूर करीत आहे. यापुढील कामाकरता अजून कितीही निधी लागला तरी मी तो देणार असून अद्यावत व सुंदर असे प्रार्थनास्थळ बनविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मुस्लिम समाजाच्या सर्व मागण्या मी दिपकआबा सोबत मिळून पूर्ण करणार आहे पुढील वर्षी येणाऱ्या बकरी ईदची नमाज नवीन अद्यावत ईदगाह मैदानात होईल यासाठी अत्यंत गतीने हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले. या वेळी २५ लाख निधी मंजुरीचे पत्र सर्वांना वाचून दाखवण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भोरे यांनी केले.
मुस्लिम समाजाचे हाजी शब्बीरभाई खतीब यांनी यावेळी बोलताना सांगितले मी आजपर्यत अनेक आमदार बघितले परंतु मागणी अगोदर भरघोस निधी मंजूर करण्याचे पत्र देणारा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या रूपाने एकमेव पाहिला मुस्लिम समाजाचे ईदगाह मैदानाचे प्रलंबित काम त्यांच्या सहकार्याने निश्चित पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही..
0 Comments