Hot Posts

6/recent/ticker-posts

युनियन बँकला लागले विमा कंपनी एजंट आणि बँक कर्मचाऱ्यांच्या मुजोर वागणुकीचे ग्रहण

 युनियन बँकला लागले विमा कंपनी एजंट आणि बँक कर्मचाऱ्यांच्या मुजोर वागणुकीचे ग्रहण




सांगोला कटुसत्य (वृत्त):- सांगोला येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत खातेदारांना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा आणि नव्याने आलेल्या बँक कर्मचाऱ्याच्या विनम्र सेवेअभावी मानसिक त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सध्याचे जग हे डिजिटल युग म्हणून पावले टाकत आहे.सर्व नागरिकांचे प्रत्येक बँकेत खाते आहे. त्या खात्यातून आर्थिक देवाणघेवाण होत असते,मात्र अनेक खातेदारांनी बँकेत नाममात्र नफ्यावर फिक्स डिफॉझिट च्या रकमा गुंतविल्या आहेत.युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ही अशा खातेदारांच्या रकमा मोठ्या प्रमाणात आहेत.मात्र त्या रकमा काढत असताना किंवा इतरत्र वर्ग करत असताना बँकेतच थाटात टेबल मांडून बसलेल्या विमा कंपन्यांच्या कर्मचार्यांचे लक्ष खातेदारांकडे जाते, आणि अशा ग्राहकांना हेरून त्यांची मनधरणी करून जबरदस्तीने ग्राहकांना विमा उतरविण्यास भाग पाडले जातअसल्याच्या तक्रारी खातेदारातुन वाढत आहेत.   मागील काही दिवसांपूर्वी सांगोला शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यांला ही विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी "इन्शुरन्स पॉलिसी"नावाच्या गोंडस शब्दाखाली अडकवून त्याची लाखो रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते,पण त्याव्यापाऱ्यांनी जास्त गाजावाजा करताच त्याला ती रक्कम परत दिली.अनेक ग्राहकांनी विमा पॉलिसीसाठी जबरदस्ती नको,किंवा अति लोभाची आमिषे दाखवून करण्याच्या प्रवृत्तीला विरोध केला .              खातेदार हा बँकेचा परमेश्वर मानला जातो. पण याच खातेदारांना युनियन बँकेत गेल्या नंतर कर्मचाऱ्याच्या उद्धट वर्तनाचा सामना करावा लागत आहे.कार्यकर्तव्यात कसूर करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या उर्मट व शिवराळ भाषेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे, अश्या या मुजोर बँक कर्मचाऱ्यांमुळे खातेदारांच्या सन्मानाला ठेस पोहचत असल्याच्या भावना त्यांनी तक्रारीच्या सुरात व्यक्त केल्या. कर्मचारी बदली झाल्याने अशी अवस्था बँकेची झाली असल्याची चर्चा खातेदारांतुन बोलली जात आहे.                
हे जर बँकेने या पॉलिसी एजंटच्या बाबतीत निर्णय न घेतल्यास तसेच बँक कर्मचाऱ्याच्या वागणुकीत व सेवेत फरक नाही पडल्यास ,मोठ्या प्रमाणावर नागरिक समाजसेवकांकडे तक्रारी करून त्यांच्याबरोबर मोठे जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत , असे समजते .
युनियन बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी खातेदारांना सेवा व्यवस्थित देत नसल्याच्या तक्रारींचा पाढा वाढत आहे, येणाऱ्या काळात बँकेच्या अशा तक्रारी बंद नाही झाल्या तर लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने सडेतोड उत्तर दिले जाईल.



विकास बनसोडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी 

Reactions

Post a Comment

0 Comments