उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 11, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीची पाहणी 

कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिसांचा केला गौरव 
सेवा काळात कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्यांच्या पाल्यांना दिली नियुक्ती पत्रे

पुणे, :- उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन केलेल्या कामाची पाहणी केली.  कोरोना काळात सेवेत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव तसेच या सेवा काळात ज्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना पोलीस दलात नेमणूक पत्र त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तासह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेअपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकरपोलीस उपायुक्त पंकज देशमुखश्रीमती स्वप्ना गोरेमितेश घट्टेप्रियांका नारनवरेसहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कर्तव्यावर असतांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या अमंलदाराच्या तीन पाल्यांना अनुकंपातत्वावर नियुक्तपत्र देवून पोलीस दलात नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये सामेश संतोष  म्हेत्रेअभिजीत आनंद गायकवाडप्रसाद दिलीप वावरे यांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोनाच्या काळात चागंली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरिक्षक विजय पुराणिकपोलीस उपनिरीक्षक गौरव देवसहा पोलीस निरीक्षक सुहास टिळेकरपोलीस नाईकउत्तम गाडेगौरव कांबळेशिपाई रेणुका भांगरे यांचा समावेश आहे.

पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथील नुतनीकरणच्या वेळी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदार यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages