Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त टेंभुर्णी पुरातन वेशीच्या बांधकामाला 22 हजार रुपयांचे अर्थसहाय्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त टेंभुर्णी पुरातन वेशीच्या बांधकामाला 22 हजार रुपयांचे अर्थसहाय्य

नूतन तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे व तालुका प्रसिद्धी प्रमुख सतीश काळे यांनी केली मदत

          टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त): राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त टेंभुर्णी (ता.माढा) येथील पुरातन वेशीच्या बांधकामासाठी 22 हजार रुपयांची मदत राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे व तालुका प्रसिद्धी प्रमुख सतीश काळे यांच्या तर्फे  करण्यात आली.

          काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिना चे  औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन पदाधिकारी सतीश काळे व सचिन होदाडे यांनी सामाजिक बांधिलकी समजून 22 हजार रुपयांचा धनादेश इंदापूर वेस बचाव कृती समितीला सदर कामाचे ठिकाणी जाऊन दिला. टेंभुर्णी पूर्व व पश्चिम बाजूस दोन मोठी प्रवेशद्वार आहेत त्यापैकी गावच्या पश्चिम बाजूस अकलूज रोड लागत ची वेस ही इंदापूर वेस म्हणून ओळखली जाते. 

          मागील दहा वर्षा पासुन तिची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती व टेंभुर्णी गावचा हा ऐतिहासिक ठेवा हा इतिहास जमा होऊ लागला होता मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण व पडझड  झाली असल्यामुळे इंदापूर वेश ही नामशेष होण्याच्या मार्गावर होती. गावातील काही तरुण मंडळींनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली ही वेश बांधण्याचा निर्णय घेतला व त्याचे  काम चालू केले हा ऐतिहासिक ठेवा वाचवण्यासाठी समितीकडून ग्रामस्थांकडे मदतीसाठी आव्हान केले होते त्याच आव्हानाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापदिनाचे औचित्य साधून 22 हजाराची आर्थिक मदत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी केली.

          यावेळी इंदापूर वेश बचाव कृती समितीचे अध्यक्ष गौतम कांबळे सचिव विलास कोठावळे गटनेते योगेश बोबडे, मयूर काळे,भाऊसाहेब महाडिक, परमेश्वर खरात, जयवंत पोळ गोवर्धन नेवसे, महादेव स्वामी, गणेश भोज इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच समितीतर्फे ग्रामस्थांना मदती चे आवाहन करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments