मोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधीला अर्थसंकल्पात मंजुरी

आमदार यशवंत तात्या माने यांची माहिती

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विशेष सहकार्यतुन व माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष बळीराम(काका)साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ मतदारसंघातील शेतीसिंचन आणि पाणीपुरवठा योजनांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी रुपयांचा तर उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापुर उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी असा एकुण ८० कोटीचा निधी चालू अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला आहे.अशी माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी दिली.
मोहोळ मतदारसंघातील जलसिंचनाचा उर्वरित टप्पा पूर्ण होण्यासाठी आष्टी व शिरापुर उपसा जलसिंचन योजनांसाठी निधीची मागणी आमदार माने यांनी सातत्याने शासनदरबारी केली होती. विधानसभेच्या निकालानंतर आयोजित गावभेट दौऱ्या दरम्यान मला, जि.प.सदस्य बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांना या सिंचन योजनांचा लाभ होऊ शकणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी यासाठी त्वरित निधी खेचून आणून योजना पूर्ण करण्याची मागणी केली होती. सदरच्या योजनेसाठी मागील सन २०२०- २०२१ च्या आर्थिक अर्थसंकल्पामध्ये मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा योजनेसाठी ४० कोटी तर शिरापुर उपसा योजनेसाठी ३० कोटी असा ७० कोटीचा निधी मंजूर असून चालू बजेट मध्ये ८० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे असेही आमदार माने यांनी यावेळी सांगितले. आमदार माने यांच्या दीड वर्षाच्या कालावधीत दोन्ही उपसा योजनेसाठी १५० कोटीचा निधी मंजूर झाला असून मोहोळ मतदारसंघातील मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरणारी योजना डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण करण्याचा मनोदय देखील यावेळी आमदार यशवंत माने यांनी यावेळी व्यक्त केला. मोहोळ मतदारसंघाचा विधानसभा प्रतिनिधी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे मोठे आव्हान समोर होते. माजी आमदार राजन पाटील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे या दोन्ही मार्गदर्शक नेत्यांनी सुरुवातीपासूनच जलसिंचनासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याच्या सूचना मला दिल्या होत्या.
राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री तथा अजित दादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आदी मंत्री महोदयांनी मोहोळ मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने अनुकूल भूमिका घेत आम्ही केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याचे कर्तव्य मी पार पाडत आहे.आमदार यशवंत माने मोहोळ विधानसभा
0 Comments